kolhapur ambabai jewellery of rupees 64 lakh gold jewelry in kolhapur today 
कोल्हापूर

अंबाबाईच्या खजिन्यात आणखी 64 लाखांचे सोन्याचे दागिने

संभाजी गंडमाळे

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या खजिन्यात आता आणखी 64 लाखांच्या सोन्याच्या दागिण्यांचा समावेश झाला आहे. एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 पर्यंत देवीला अर्पण झालेल्या दागिण्यांच्या मुल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून एकूण एक हजार 909 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिण्यांचा त्यात समावेश आहे. 

दरम्यान, मंदिरातील गरूड मंडपात दागिने मुल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली व मुंबईचे प्रसिध्द सराफ व्यावसायिक पुरूषोत्तम काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शकपणे देवस्थान समितीने ही प्रक्रिया पूर्ण केली असल्याचे समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सचिव विजय पोवार यांनी सांगितले. एका वर्षात श्री अंबाबाईला अठरा हजार 229 ग्रॅमचे चांदीचे दागिणे भाविकांनी अर्पण केले असून त्याची किंमत सात लाख वीस हजार पंचावन्न इतकी आहे. 

दख्खनचा राजा जोतिबाला 276 ग्रॅमचे नऊ लाख वीस हजार किमतीचे सोन्याचे तर सात हजार 752 ग्रॅम वजनाचे दोन लाख 85 हजार 782 किंमतीचे सोन्याचे दागिणे भाविकांनी अर्पण केले आहेत. दरम्यान, सोन्याचा प्रति दहा ग्रॅम दर 33 हजार तीनशे तर चांदीचा प्रति किलो दर 39 हजार पाचशे रूपये या प्रमाणे मुल्यांकन झाले आहे. समितीच्या खजानीस वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, चारूदत्त देसाई, राजाराम गरूड आदींच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण झाली. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

Stock Market Today: युद्धातही शेअर बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 450 अंकांनी वाढला; कोणते सेक्टर तेजीत?

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

SCROLL FOR NEXT