kolhapur ambabai kirnotsav sohla last day 
कोल्हापूर

अंबाबाईच्या मुर्तीवर मावळतीच्या सूर्यकिरणांचा अभिषेक 

संभाजी गंडमाळे

कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाच्या अखेरच्या दिवशी आज मावळतीच्या सूर्यकिरणांनी श्री अंबाबाईच्या मुर्तीवर अभिषेक घातला. सायंकाळी पाच वाजून 44 मिनिटांपासून सलग चार मिनिटे हा नयनरम्य सोहळा यानिमित्ताने अनुभवता आला. 

दरम्यान, किरणोत्सवादरम्यान एक ढग आडवा आला. पण, काही काळातच तो बाजूला गेला आणि किरणोत्सव पूर्ण क्षमतेने साजरा झाला. देवीच्या मुर्तीच्या किरीटापासून ते चरणापर्यंत संपूर्ण मुर्ती लख्ख सूर्यकिरणांनी न्हाऊन निघाली. 

महाव्दार कमानीजवळ पाच वाजता सूर्यकिरणे आली. त्यानंतर सहा मिनिटांनी गरूड मंडपात किरणे आली. पाच वाजून सतरा मिनिटांनी चौथऱ्यापर्यंत त्यानंतर पाच वाजून 32 मिनिटांनी कासव चौकात, पाच वाजून 37 मिनिटांनी पितळी उंबरा, पाच वाजून 43 मिनिटांनी कटांजन असा प्रवास करत पाच वाजून 44 मिनिटांनी किरणांनी चरणस्पर्श केला. पुढे चार मिनिटे संपूर्ण मुर्तीवर किरणांनी जणु अभिषेकच घातला, अशी माहिती प्रा. मिलिंद कारंजकर यांनी दिली. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसवाले आधीपासूनच नग्न, कपडे काढण्याची काय गरज? AI परिषदेतील आंदोलनावरून PM मोदींची बोचरी टीका

Navpancham Yog 2026: गुरु-बुधाची खास कृपा! 24 तासांत 3 ‘या’ राशींना मिळणार मोठं वरदान

Youth Dies During Police Bharti : पोलिस होऊन येतो म्हणून सांगून गेला अन् मृतदेह दारात आला, सांगलीच्या तरुणाचा भरती दरम्यान मृत्यू

Rahul Gandhi: महापालिका निवडणूक अपयशाचा आढावा, निकालावर राहुल गांधींकडून नाराजी

Nashik Municipal Corporation : लोकसंख्या २५ लाख अन् कर्मचारी केवळ ४ हजार! नाशिक महापालिकेचा डोलारा खिळखिळा

SCROLL FOR NEXT