kolhapur sakal
कोल्हापूर

Kolhapur : रुग्‍णवाहिका विम्याविना

संघटनांचा १० वर्षे पाठपुरावा; शेकडो लोकांचा जीव धोक्यात

सदानंद पाटील

कोल्‍हापूर : जिल्‍हा परिषदेच्या ७० ते ८० रुग्‍णवाहिकांतून दररोज चालक, रुग्‍ण, डॉक्‍टर, नर्सेस अशा शेकडो लोकांचा जिल्‍ह्याच्या कानाकोपऱ्यांत प्रवास होतो, मात्र या रुग्‍णवाहिका विम्याशिवाय धावत असून, थेट सरकारी यंत्रणेकडूनच नियम कसे धाब्यावर बसवले जातात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. नुकताच एका अपघात प्रकरणात जिल्‍हा परिषदेला ९० लाख भरण्याचे आदेश झाले आहेत.

एवढ्या र‍कमेची तरतूद नसल्याने शासनाकडे मागणी केली, मात्र अशा ८ ते १० प्रकरणांचा निकाल बाकी आहे. त्यामुळे विम्यासाठी ४० लाख खर्च करून जिल्‍हा परिषदेच्या कर्मचारी, डॉक्‍टर, रुग्‍णांना दिलासा द्यायचा की भरपाईसाठी कोट्यवधी खर्च करायचे, याचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

आरोग्य विभागाला शासनाकडून रुग्‍णवाहिका उपलब्‍ध आहेत; मात्र रुग्‍णवाहिकांचा विमाच उतरलेला नाही. वाहनचालक संघटनेकडून, तर मागील दहा वर्षांपासून जिल्‍हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे या वाहनांचा विमा उतरण्याची मागणी लावून धरली आहे, मात्र मागील चार जिल्‍हा आरोग्य अधिकाऱ्यांनी विमा उतरण्याकडे दुर्लक्षच केल्याचे सांगण्यात येत आहे. शासनाच्या वाहनाचा विमा उतरण्याची काही गरज नाही, असे आरोग्य विभागाने सांगितले, मात्र तशा प्रकारचे लेखी आदेश नसल्याने पंचाईत झाली आहे.

दोन वर्षांपूर्वी चंदगड तालुक्यातील हेरे प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्‍णवाहिका दरीत कोसळून ३ कर्मचाऱ्यांचा जागीच, तर एकाचा रुग्‍णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी दाखल खटल्यातील एका प्रकरणाचा निकाला लागला असून, जिल्‍हा परिषदेला ९० लाख भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत, मात्र जिल्‍हा परिषदेकडे याबाबतची तरतूद नसल्याने शासनाकडे निधीची मागणी केली आहे.

हेरे अपघातातील तीन मृत्‍यूबाबतचा निकाल लागणे बाकी आहे. हेर्ले (ता. हातकणंगले) आणि अन्य तीन अपघातांचा निकालही बाकी आहे. जर रुग्‍णवाहिकांचा विमा उतरला असता तर ३५ ते ४० लाख खर्च आला असता; मात्र तसे न केल्याने भरपाईपोटी कोट्यवधी रुपये देण्याची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: युद्धातही शेअर बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 450 अंकांनी वाढला; कोणते सेक्टर तेजीत?

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

पुण्याची बातच न्यारी! मृणाल ठाकूरने पुण्यात येताच केली 'ही' गोष्ट, खास मराठी पोस्ट करत म्हणाली... 'पुण्यात आलो आणि...'

SCROLL FOR NEXT