Dhananjay Mahadik vs Rajesh Kshirsagar esakal
कोल्हापूर

'उत्तरे'त ठिणगी, 'दक्षिणे'त वणवा; खासदार महाडिक-क्षीरसागर यांच्यातील वादाला तोंड फुटण्याची शक्यता, काय आहे कारण?

Kolhapur Assembly Elections : विद्यमान आमदार ज्या पक्षाचा त्याला तो विधानसभा मतदारसंघ असे सर्वसाधारण जागा वाटपाचे सूत्र महायुतीत ठरले आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर दक्षिणची जागा ही भाजपला जाणार हे निश्‍चित आहे. या मतदारसंघातून माजी आमदार अमल महाडिक किंवा त्यांच्या पत्नी शौमिका या संभाव्य उमेदवार आहेत.

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा संभाव्य ‘फॉर्म्युला’ ठरला असला तरी प्रत्यक्ष जागा वाटप झालेले नाही. तोपर्यंत शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये कोल्हापूर उत्तर व दक्षिणवरून सत्तासंघर्ष सुरू झाला. यातून खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) विरुद्ध राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांच्यातील वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

खासदार महाडिक यांचे पुत्र कृष्णराज यांनी कोल्हापूर उत्तरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेली पोस्‍टरबाजी, संधी मिळाली तर लढण्याचा दिलेला इशारा आणि त्याला महाडिक गटाकडून मिळत असलेले बळ हेच महाडिक-क्षीरसागर वादाला कारणीभूत ठरत आहे. कृष्णराज महाडिक यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांना खासदार महाडिक यांनी समज द्यावी, असा सल्ला क्षीरसागर यांनी दिला होता. त्यापुढे जाऊन आज क्षीरसागर यांनी कोल्हापूर दक्षिणच्या शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा अमृतसिध्दी कार्यालयात घेऊन एकप्रकारे महाडिक यांनाच शह दिल्याचे बोलले जाते.

विद्यमान आमदार ज्या पक्षाचा त्याला तो विधानसभा मतदारसंघ असे सर्वसाधारण जागा वाटपाचे सूत्र महायुतीत ठरले आहे. त्यामुळे उत्तरची जागा २०१९ ला निकषानुसार त्या वेळच्या शिवसेनेकडे होती; पण २०२२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत ही जागा भाजपला मिळाली आणि सत्यजित कदम लढले. त्या जोरावर भाजपने या जागेवर हक्क सांगितला आहे. पण, २०२९ च्या निकषावर ही जागा शिवसेना शिंदे गटालाच मिळावी, यासाठी क्षीरसागर यांचे प्रयत्न सुरू आहेत. पण, तोपर्यंत कृष्णराज महाडिक यांनी आपणच प्रबळ दावेदार असल्याचा दावा करत विकास कामाला निधी आणणे, शहरभर त्याचे पोस्टर लावणे, प्रतिक्रिया देणे यासारखे प्रकार सुरू केले आहेत. यावरून क्षीरसागर नाराज आहेत.

कोल्हापूर दक्षिणची जागा ही भाजपला जाणार हे निश्‍चित आहे. या मतदारसंघातून माजी आमदार अमल महाडिक किंवा त्यांच्या पत्नी शौमिका या संभाव्य उमेदवार आहेत. पण, ‘उत्तर’मध्ये कृष्णराज यांच्या भूमिकेने वादाची ठिणगी पडली आहे, त्याचा वणवा क्षीरसागर यांनी आज थेट दक्षिणध्ये मेळावा घेऊन उठवला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच हा वाद उफाळल्याने महायुतीत अस्वस्था आहे. त्यावर वरिष्ठ नेत्यांनी तोडगा काढण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.

बुधवारी फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक

या वादाच्या पार्श्‍वभूमीवर भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी (ता. ९) कोल्हापुरात विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने येत आहेत. त्यांच्या कानावर सध्‍या सुरू असलेला उत्तर-दक्षिणधील वाद काही पदाधिकाऱ्यांनी घातला आहे. या दौऱ्यात ते दोन्ही गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Metro 3: भुयारी मेट्रोचा प्रवास सुसाट; पण प्रवासी तासभर नॉट रीचेबल अन् कनेक्टिव्हिटीची अडचण, प्रवाशांमध्ये नाराजी!

IND vs WI 2nd Test: “हे किती? हे किती... सांग!” यशस्वी जैस्वालने Live सामन्यात शुभमन गिलला असे का विचारले? Funny Video Viral

Bharat Gogawale : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातुन व्हाव्यात असे वरिष्ठांचे म्हणणे आहे

Latest Marathi News Live Update : ओल्या दुष्काळाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

समुद्रकिनारी असणाऱ्या १०० कोटींच्या आलिशान बंगल्यात कुणासोबत राहतात रेखा? नोकरांना घातलीये ही महत्वाची अट

SCROLL FOR NEXT