Chandrkant Patil sakal
कोल्हापूर

'आघाडीला चंद्रकांत पाटलांची अ‌ॅलर्जी का?'

नाथाजी पाटील; प्रचारपत्रकावर फोटो छापायला विसर

सकाळ वृत्तसेवा

गारगोटी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Bank Election)निवडणुकीत भाजपने सत्तारूढ छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. तरीही सत्तारूढ आघाडीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील (Chandrkant patil) यांची अँलर्जी का, असा सवाल भाजपचे जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील (Nathaji Patil) यांनी पत्रकाद्वारे केला.

जिल्हा बँकेची ५ जानेवारीला निवडणूक होत आहे. त्यासाठी विविध पक्ष व गटाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज इतर नऊ गटामध्ये दाखल केले होते. भाजप कार्यकर्त्यांनीही इतर नऊ जागांसाठी जवळपास २५ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत ते सर्व पात्र होते. पण, निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून व आमदार विनय कोरेंच्या (Vinay Kore)जनसुराज्य आणि आमदार प्रकाश आवाडेंच्या (Prakash Aawde) ताराराणी आघाडी या भाजपाच्या मित्रपक्षांना सामावून घेतल्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी भाजप उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचा आदेश दिला. त्यांनी तत्काळ माघार घेऊन सत्तारूढ आघाडीला पाठिंबा दिला.

मात्र, निवडणूक प्रचारपत्रकावर प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा फोटो छापायला सत्तारुढ आघाडीला जाणीवपूर्वक विसर पडलेला दिसतो. सत्तारूढ आघाडीच्या नेत्यांची ही जुनीच सवय आहे. सत्तेत जाण्यासाठी अन्य लोकांची मदत घ्यायची आणि एकदा आपल्या मनाप्रमाणे झाले की मदत करणाऱ्यांना विसरायचे, हा अनुभव काही नवीन नाही. तरीही प्रदेशाध्यक्षांचा आदेश प्रमाण मानून सत्तारूढ आघाडीच्या प्रचारात भाजपाचे कार्यकर्ते कुठेही कमी पडणार नाहीत, असे पाटील यांनी कळविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT