कोल्हापूर

सर्वांना सोबत घेऊन हद्दवाढ करणारच - आमदार जाधव

हद्दवाढीसाठी शहराचे आमदार म्हणून आमदार चंद्रकांत जाधव यांनी पुढाकार घ्यावा

सकाळ वृत्तसेवा

हद्दवाढीसाठी शहराचे आमदार म्हणून आमदार चंद्रकांत जाधव यांनी पुढाकार घ्यावा

कोल्हापूर : शहराची हद्दवाढ झाली पाहिजे आणि सर्वांना सोबत घेऊन हद्दवाढ करणारच, असा विश्वास आमदार चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केला. हद्दवाढ समन्वय सर्वपक्षीय कृती समितीशी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. हद्दवाढीसाठी शहराचे आमदार म्हणून आमदार चंद्रकांत जाधव यांनी पुढाकार घ्यावा, असा आग्रह हद्दवाढ कृती समितीने धरला.

आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, ‘‘शहराचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्तेत सहभाग पाहिजे. यामुळेच विधानसभेची निवडणूक लढवली आणि सर्वांच्या सहकार्याने आमदार झालो. यामुळे हद्दवाढ करणे माझी जबाबदारी आहे. हद्दवाढ करायचीच या अनुषंगाने प्रयत्नशील आहे. ज्या चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी आहेत त्या सर्वांच्या निदर्शनास आल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करीत आहे.’’

ते म्हणाले, ‘‘शहर आणि ग्रामीणमधील मतदारसंघात असतानाही मतदारसंघात विकास साधता येतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ होय. यामुळे हद्दवाढीस विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी भीती मनात ठेवू नये कारण हद्दवाढीनंतर मतदार व मतदारसंघ कायम राहणार आहे.’’

आर. के. पोवार म्हणाले, ‘‘हद्दवाढ आता नाही, तर कधीच नाही, अशी अवस्था होणार असल्याने हद्दवाढ काळाची गरज आहे. यामुळे हद्दवाढीसाठी आमदार म्हणून आमदार चंद्रकांत जाधव यांनी पुढाकार घ्यावा.’’ ॲड. बाबा इंदुलकर म्हणाले, ‘‘हद्दवाढीबाबत वाढीव गावासह फेरप्रस्ताव सादर करावा अशी भूमिका आमदार जाधव यांनी घेतली, याबद्दल समन्वय समितीच्या वतीने आमदार जाधव यांचे अभिनंदन. हद्दवाढीला विरोध करणाऱ्यांची समजूत काढण्यासाठी गावोगावचा दौरा करून चर्चा करावी.’’

हद्दवाढीला अडथळा असलेले असक्षम प्राधिकरण रद्द करण्यासाठी शासनाला पत्र द्यावे अशी मागणी दिलीप देसाई यांनी व्यक्त केली. बाबा पार्टे, अशोक भंडारे, सुनील देसाई, सुभाष जाधव, दुर्गेश लिंग्रस, किशोर घाटगे, संजय जाधव, कमलाकर जगदाळे, श्रीकांत माने, विवेक कोरडे, चंद्रकांत बराले, अशोक भंडारे, सुनील पाटील, दिलीप देसाई, विजय शिंदे, अनुप पाटील उपस्थित होते.

"राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हद्दवाढ रखडली आहे. प्रत्येकजण आपापला मतदारसंघ पाहतो. यामुळे हद्दवाढ झालेली नाही. त्यामुळे शहराचा अन् पर्यायाने जिल्ह्याचा विकास खुंटला आहे, याकडे मात्र प्रत्येकजण सोईस्कररीत्या दुर्लक्ष करत आहे."

- चंद्रकांत जाधव, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू; पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीने मोडले ९ विक्रम... एकाच खेळीत इतके पराक्रम... Orange Cap ही केली नावावर

Pune News : मोठी बातमी! कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सारसबाग राहणार दोन दिवस बंद

Latest Marathi News Live Update : पुण्यात बकरी ईदनिमित्त पोलिसांचा चोख बंदोबस्त

Vaibhav Sooryavanshi Records: १२ षटकार, ५ चौकार! वैभवची Fastest IPL Century हुकली; २९ चेंडूंत ९७ धावांवर OUT; जयसूर्याचा विक्रम मात्र मोडला

SCROLL FOR NEXT