kolhapur sakal
कोल्हापूर

Kolhapur : भावाच्या स्वप्नपूर्तीसाठी बहिणीचा ध्यास

मुलांना अभ्यासाचे मार्गदर्शन अन् लाईफ कोचिंगचे धडेही

नंदिनी नरेवाडी

कोल्हापूर : मोरेवाडी परिसरातील तानाजी व माधवी पोवार यांचे चौकोनी सुखवस्तू कुटुंब. चिरंजीव सरोज, कन्या शामली ही मुले हुशार आणि चुणचुणीत. सरोजचे आयएएस अधिकारी होण्याचे ध्येय. अधिकारी झाल्यावर आपल्यासारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करायचे, असेही त्याचे स्वप्न होते. मात्र, ध्येयाच्या मार्गावर असतानाच त्याचा अपघाती मृत्यू झाला आणि त्याची दोन्ही स्वप्ने दुभंगली. या धक्क्याने न खचता बहीण शामलीने त्याचे स्वप्न पूर्ण करायचे, या ध्येयाने विचार करू लागली. तिने अभियांत्रिकीतून पदवी घेतली होती. लाईफ कोचिंगचेही धडे घेतले होते. याच जोरावर तिने शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे देत भावाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पावले टाकली.

तीन वर्षांपूर्वी शामलीचे शिक्षण पूर्ण झाले होते. पुढील शिक्षण परदेशात घेण्याचा तिचा मानस होता. यादृष्टीने तिने इंटरनॅशनल इंग्लिश लॅंग्वेज टेस्टिंग परीक्षाही दिली. यात उत्तीर्ण झाल्यानंतर तिला एम. एस. करण्यासाठी ऑस्ट्रेलिया, इंग्लडमधील विद्यापीठाकडून प्रवेशाचे पत्रही मिळाले होते. मात्र, भावाच्या निधनानंतर तिने स्वतःचे ध्येय बाजूला ठेवत भावाच्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करू लागली. त्याचवेळी कोरोनाचे संकट आले.

शाळा, महाविद्यालयेही बंद झाली. चार भिंतीच्या आत राहिलेल्या मुलांना पुन्हा शाळेत पाठवणे आणि अभ्यास सुरू करणे, हे आव्हान पालक, शिक्षकांसमोर होते. अशा वेळी मदत झाली ती शामलीने लिहिलेल्या ‘अभ्यास आणि मी’ या पुस्तकाची. शाळेपासून दुरावलेल्या मुलांना शाळेची गोडी लागावी, याची सोप्या भाषेत माहिती देणारे हे पुस्तक शाळा, महाविद्यालय, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही मार्गदर्शक ठरले. विविध शाळांत तिने मुलांना अभ्यासावर लक्ष कसे केंद्रित करावे आणि ध्यानधारणा अभ्यासात कशी उपयुक्त ठरते, याचे प्रात्यक्षिकही सुरू केले. आजपर्यंत तिने २५ हून अधिक शाळांमध्ये याचे धडे दिले आहेत.

वयाच्या विसाव्या वर्षी शिवचरित्राचे लेखन

शामलीने वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजेच पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्‍वाचे पैलू उलगडणारे ‘कहाणी स्वराज्याची’ या पुस्तकाचे लेखन केले. यंदा या पुस्तकाची दुसरी आवृत्तीही प्रकाशित झाली. शिवजयंतीला यू ट्यूब चॅनेल सुरू करून छत्रपती शिवाजी महाराजांचे व्हिडिओही प्रदर्शित केले आहेत.

करिअर घडविताना मुलांच्या संघर्षाचा मार्ग सोपा व्हावा, यासाठी भाऊ सरोजने प्रयत्न केले होते. तेच प्रयत्न मी करीत आहे. त्यासाठी मी विशेष प्रशिक्षणही घेतले. त्यातून लाईफ कोचिंगचे धडेही विद्यार्थ्यांना देते.

- शामली पोवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT