Kolhapur bullion drowned in Radhanagari lake near Rautwadi waterfall kolhapur marathi news 
कोल्हापूर

राऊतवाडी धबधब्यालगतच्या राधानगरी तलावात कोल्हापूरच्या सराफाचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

राधानगरी  (कोल्हापूर)  : येथील राऊतवाडी धबधब्या शेजारील परिसरात राधानगरी तलावांमध्ये बुडून एकाचा मृत्यू झाला. विवेक कमलाकर नागवेकर (वय 45 रा. नागाळा पार्क कोल्हापूर)  असे त्यांचे नाव आहे. काल सायंकाळी येथील एका रिसॉर्टवर मित्रमंडळींना समवेत ते आले होते. 

याबाबत पोलिसांतून व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी
राऊतवाडी धबधबा परिसरातील धरणाच्या काठावर असलेल्या एका होम स्टे रिसॉर्टमध्ये काल कोल्हापुरातून सात मित्र आले होते. त्यामध्ये राधानगरी तालुक्यातील एका नेत्याच्या मुलग्याचाही समावेश होता. हे सर्व मित्र दुपारी एक-दीडच्या सुमारास येथे आल्यानंतर जेवण केले आणि यापैकी तिघे-चोघे जण सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास इथूनच दोनशे मीटरवर दरीत असलेल्या राधानगरी तलावाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले. त्यांच्यामध्ये विवेक नागवेकर हेही होते. काही वेळातच तोल गेल्याने ते पाण्यात बुडाले.त्यांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. 

रिसॉर्ट मधील कर्मचारी व रावतवाडी ग्रामस्थांच्या मदतीने शोधाशोध सुरू होती मात्र पत्ता लागला नाही अखेर रात्री याबाबत पोलिसात तक्रार नोंद केली. अंधार पडल्याने शोध मोहीम थांबली होती. आज सकाळी नागवेकर यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. पोलिसांनी तो बाहेर काढून  पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. नागवेकर हे कोल्हापुरातील भेंडे गली येथील सराफी व्यावसायिक होते. या घटनेबाबत राधानगरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंद झाली आहे.

अलीकडे राधानगरी जलाशयाच्या काठावर अभयारण्याच्या सनिध्यात अनेक रिसॉर्ट आकारास आले आहेत. बरेच हुल्लडबाजी तरुण मौजमजेसाठी येतात आणि पाण्यात उतरतात त्यांच्यासाठी ही धोक्याची सूचना ठरली आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रिल्समध्ये प्रामाणिकपणाचा आव, कारवाई टाळण्यासाठी मासिक हप्त्याची मागणी; ६ लाख घेताना तहसीलदाराला अटक; कोण आहे विजय चव्हाण?

T20 Squad: 501 धावा, 28 विकेट्स, 732 रन्स... तरीही या तीन मॅच विनर्सना टीम इंडियात जागा नाही; BCCI चा नेमका प्लॅन काय?"

Maharashtra Rain: मान्सून आला पण सक्रिय नाही; राज्यातील पावसाबाबत मोठं अपडेट, सरकारकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचा सल्ला

Latest Marathi News Live Update : नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी नाही

IND vs AFG Test: भारताने केला डाव घोषित, अफगाणिस्तानसमोर धावांचा डोंगर! गिल, राहुल, पंत, सुदर्शनसह वॉशिंग्टनचीही 'सुंदर' खेळी

SCROLL FOR NEXT