kolhapur case Motor from Rajaram dam to river The driver of the car escaped 
कोल्हापूर

राजाराम बंधाऱ्यावरून चारचाकी थेट नदीत ; दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव

राजेश मोरे

कोल्हापूर : राजाराम बंधाऱ्यावरू आज दुपारी एक मोटार थेट नदीत पडली. चालकाने पाण्यातच गाडी बाहेर येऊन स्वतःचा जीव वाचविला. मोटार मात्र सुमारे एक किलो मीटर पुढे वाहत गेली. चालक पोहत पाण्याबाहेर आला. यावेळी येथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. चालक जयजित श्रीकांत भोसले (वय 39, रा. रविवार पेठ) असे चालकाचे नाव आहे. याबाबतची नोंद करण्याचे काम शाहूपुरी पोलिसात सुरू होते. 

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती

जयजीत भोसले हे वडणगे (ता. करवीर) कडून राजाराम बंधारा मार्गे कसबा बावड्याच्या दिशेने येत होते. राजाराम बंधाऱ्याचा अंदाज न आल्याने ही मोटार थेट नदीत पडली. ही घटना नदीकाठी असणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी आरडाओरड केली. पण मोटार वाहत्या प्रवाहाबरोबर पुढे जात होती. दरम्यान यातील चालक जयजीत भोसले यांनी प्रसंगावधान ओळखून मोटारीतून बाहेर पडले. त्यानंतर पोहत ते काठाच्या दिशेने येत होते. त्यांना येथील नागरिकांनी मदत केली. तसे ते सुखरूप पाण्याबाहेर आले. पण मोटार वाहत्या पाण्याला लागल्याने तिला बाहेर काढण्यात नागरिकांना यश आले नाही. अखेरीस हा प्रकार शाहूपुरी पोलिसांना समजला. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 


वडणगे मार्गे बावडा वाहतूक बनते धोकादायक 
अरुंद राजाराम बंधाऱ्याला संरक्षक कठडे नाहीत. त्यामुळे चालकाला बंधाऱ्याचा अंदाज येतोच असे नाही. यामुळे ही दुर्घटना घडली. नवीन पुलाचे बांधकाम अर्धवट पडले आहे. परिणामी वडणगे मार्गे बावडा वाहतूक धोकादायक झाली आहे. याबाबत प्रशासनाने वेळीच लक्ष घालून तातडीच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT