kolhapur celebrity stay at home 
कोल्हापूर

एकच वादा घरी थांबा... कोरोनाशी नडला, त्याचा डाव ढिस...! 

संभाजी गंडमाळे

'जलवा' रमलाय लेखनात... 

'जीव झाला येडापीसा' या मालिकेतील दिलखुलास 'जलवा' म्हणजे कोल्हापूरचा चिन्या अर्थात विकास पाटील. या मालिकेचे लेखनही तोच करतो. त्यामुळेच अस्सल कोल्हापुरी शब्दांची मांदियाळी साऱ्या मालिकाभर जाणवते. तो सांगतो, "सध्या घरच्यांना वेळ देतोय; पण मालिकेच्या पुढच्या भागाचे लिखाण आणि एका चित्रपटाचे लिखाणही सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाच्या मदतीने आम्ही सर्व कलाकारांनी मिळून एक व्हिडिओ शेअर केला. परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत आमचा हा जागर सुरूच राहणार आहे. लवकरच दुसरा व्हिडिओ शेअर करत असून सर्वांनाच तो अंतर्मुख करेल.'' 

'राजाराम'चे व्हिडिओ कॉलिंग... 

'सावित्रीज्योती' मालिकेतील 'राजाराम' सध्या घरातूनच साऱ्या मित्रांशी गप्पा मारतो आहे. अर्थात त्यासाठी त्याने व्हॉटस्‌ ऍपच्या व्हिडिओ कॉलिंगचा आधार घेतला आहे. एकत्र येऊन गप्पा मारता येत नसल्यानं त्यानं हा पर्याय निवडला आहे. तो सांगतो, "सगळं निवांत सुरू असलं तरी रोजचा 'वर्कआऊट' चुकवून चालत नाही. वाचन आणि फिल्म पाहणे, या गोष्टी आहेतच. त्याशिवाय फोनच्या कॉन्टॅक्‍ट लिस्टमधील सर्वांचे ब्रॉडकास्ट ग्रुप तयार केले असून त्यावरून कोरोनाविषयक विविध मेसेजीस्‌, व्हिडिओ शेअर करतो. कारण अजूनही विशेषतः कोल्हापुरातील लोकांना कोरोनाचे गांभीर्य लक्षात आलेले नाही.'' 

'सरकार' एकटा जीव सदाशिव 

'जीव झाला येडापीसा'चा व्हीलन 'सरकार' म्हणजेच रोहित हळदीकर सध्या मुंबईत अडकून पडला आहे. पंधरा आणि सोळा मार्चला मालिकेचे शूटिंग झाल्यानंतर कार्टुन फिल्मच्या डबींगसाठी मुंबईला गेला. तितक्‍याच संचारबंदी जाहीर झाली आणि त्याला मुंबईतच थांबण्याची वेळ आली आहे. तो सांगतो, 'सध्या मुंबईत एकटा जीव सदाशिव' आहे. स्वतःच्या आवडीच्या रेसीपी स्वतः बनवायच्या आणि त्यावर ताव मारायचा. वाचायची राहून गेलेली पुस्तके वाचतो आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणचं पुस्तक वाचून झाले. वेबसीरिज आणि फिल्म पाहण्याचा मोह तर आवरता येत नाहीच; पण व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून मित्रांशी गप्पांमध्येही वेळ सार्थकी लावतो आहे.'' 

'चिकन्या'चे फिल्मवर डिस्कशन 

'प्रेमाचा गेम सेम टू सेम' या मालिकेतील 'चिकन्या' अर्थात प्रमोद पुजारी घरातच रमला आहे. कोल्हापूर चित्रनगरी आणि मुडशिंगी येथे या मालिकेचे शूटिंग सुरू होते. आजवर साठहून अधिक भाग प्रसारित झाले असून या मालिकेचीही सारी टीम पुढील शेड्यूलच्या प्रतीक्षेत आहे. प्रमोद सांगतो, बघायच्या राहून गेलेल्या फिल्म्स केवळ मी एकटाच बघतो असे नाही, तर आम्ही सारे मित्र त्यावर ऑनलाईन ग्रुप डिस्कशनही करतो. सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारी 'गेले नाटक पडद्यामागे, हे नाट्य सोसवत नाही. नाटकात असतो पॉझ; पण इतका लांबत नाही' ही कविताही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT