kolhapur Changbhal Jotiba mountain sakal
कोल्हापूर

kolhapur : जोतिबा डोंगरावर ‘चांगभलं’चा गजर

खेटे सुरू : दीड लाख भाविकांची उपस्थिती, डोंगरास जत्रेचे स्वरूप

सकाळ वृत्तसेवा

kolhapur - ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’, ‘यमाईदेवी, चोपडाईदेवी, महादेव, बद्री केदार, काळभैरवाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर येथील खेट्यांना आज पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला.

पहिल्या खेट्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील सुमारे दीड लाख भाविकांनी हजेरी लावली. मोठ्या गर्दीमुळे आज डोंगरास जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. ‘चांगभलं’च्या जयघोषांनी जोतिबाचा डोंगर दणाणून गेला.

आज पहाटेपासूनच भाविक डोंगरावर येण्यास सुरुवात झाली. सकाळी अकरा वाजेपर्यंत डोंगरावर मोठी गर्दी होती. दुपारनंतर गर्दी थोडी कमी झाली. सायंकाळनंतर मात्र भाविकांच्या झुंडी डोंगरावर येत होत्या.

आज मंदिरात विविध धार्मिक विधी झाले. यावेळी केदार कवच, केदार स्तोत्र, केदार महिमा या विधींचे पठण करण्यात आले. सकाळी दहा वाजता श्री जोतिबा देवाची आलंकारिक महापूजा बांधण्याता आली. दुपारी बारा वाजता धुपारती सोहळा झाला.

आज भाविकांना नव्याने बांधण्यात असलेल्या दर्शन मडंपातून दर्शन रांगेची सोय केली. त्यामुळे या भाविकांचे उन्हापासून संरक्षण झाले. आज दर्शन रांग दक्षिण दरवाजापर्यंत गेली. रात्री चांगभलंच्या जयघोषात भव्य पालखी सोहळा झाला. भाविकांनी पालखीवर तसेच शिखरावर गुलाल खोबऱ्यांची उधळण केली.

ड्रोन कॅमेऱ्यातून गर्दीवर नजर

जोतिबा डोंगरावर खेट्यांच्या वेळी अनेकजण उद्धट वर्तन करून दंगा करतात. याला आळा घालण्यासाठी शनिवारपासून सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी पोलिस यंत्रणा सज्ज ठेवली. त्यामुळे हुल्लडबाजीस आळा बसला. पोलिस विभागाच्या सूचनेनुसार पश्चिम महाराष्टू देवस्थान समितीने ड्रोन कॅमेऱ्यातून गर्दीवर नजर ठेवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT