raju shetti sakal media
कोल्हापूर

कोल्हापूर : ‘महाविकास’कडून पाठीत खंजीर

राजू शेट्टी आक्रमक; हाच खंजीर त्यांच्या पाठीत खुपसू

सकाळ वृत्तसेवा

राजू शेट्टी आक्रमक; हाच खंजीर त्यांच्या पाठीत खुपसू

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (KOLHAPUR DISTRICT BANK)स्वाभिमानीला एक जागा देण्याचे नेत्यांनी मान्य केले होते; पण आता शिरोळच्या(SHIROL) जागेचा मुद्दा पुढे करून संघटनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम सुरू असून भविष्यात हाच खंजीर त्यांच्या पाठीत खुपसण्याचा इशारा स्वाभिमानीचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी (RAJU SHETTI) यांनी पत्रकार परिषदेत दिला.

श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘बँकेच्या निवडणुकीत एक जागा देण्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी मान्य केले होते. त्यावेळी विधान परिषदेची निवडणूक सुरू होती. यापुढच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवण्याचेही पाटील यांनी सांगितले होते. त्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह इतरांशी चर्चा करून निर्णय कळवण्याचे आवाहन पाटील यांना केले होते. तथापि श्री. पाटील यांनी अनुसूचित जाती गटातील जागा काँग्रेसच्या वाट्याला असल्याने हा निर्णय मीच घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता नव्याने प्रस्ताव देताना त्यांनी शिरोळ विकास संस्था गटातील जागा बिनविरोध करून माघार घेईल त्याला स्वीकृतचा पर्याय दिला आहे.’’

हा पर्याय मान्य नाही. कारण या गटात उमेदवार एक शिवसेना पुरस्कृत व एक काँग्रेसचा आहे. तालुका गटातील विद्यमान संचालक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विरोधात तिथे सर्वपक्षीयांनी मोट बांधली आहे. गणपतराव पाटील तिथे विरोधात आहेत, ते काँग्रेसचे आहेत. ही जागा बिनविरोध करून श्री. पाटील स्वीकृत होतील. याचा अर्थ बँकेच्या निवडणुकीत आमची फसवणूक झाली असून नेत्यांनी पाठीत खंजीर

खुपसला आहे. आयत्यावेळी पाठीत खुपसलेला हा खंजीर उलटा फिरवायला वेळ लागणार नाही, असा इशाराही श्री. शेट्टी यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता लगावला. यावेळी संघटनेचे प्रा. जालंदर पाटील उपस्थित होते.

उद्या दुपारपर्यंत वाट पाहू

संघटनेला बँकेच्या निवडणुकीत न्याय देण्यासाठी महाविकास आघाडीकडे अजूनही वेळ आहे. आम्ही उद्या दुपारपर्यंत नव्या प्रस्तावाची वाट पाहू, त्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ, असेही श्री. शेट्टी यांनी यावेळी सांगितले.

कोरे, आवाडेंकडून समजूत

श्री. शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करून बँकेची निवडणूक लढवण्याचा इशारा दिल्यानंतर आमदार विनय कोरे व प्रकाश आवाडे यांनी श्री. शेट्टी यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याला या घडीला तरी यश आले नाही. उद्या याबाबत पुन्हा चर्चा करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT