आमदार सतेज पाटील sakal
कोल्हापूर

Kolhapur : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना लुटणाऱ्यांना धडा शिकवूया

राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना हा सभासदांच्या मालकीचाच राहावा, त्याचे खासगीकरण होऊ नये यासाठी ही लढाई आहे. गेली २८ वर्षे कारखाना लुटणाऱ्यांना धडा शिकवून सभासदांना आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे.

सत्ताधाऱ्यांनी आमच्या उमेदवारांना अपात्र ठरविण्यासह कितीही कारस्थाने रचली तरी स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने ही लढाई आपण नक्की जिंकणार,’ असा विश्‍वास विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचे प्रमुख आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

राजाराम साखर कारखाना निवडणुकीसाठी छत्रपती राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ कसबा बावडा येथील हनुमान मंदिरात आमदार पाटील, आमदार ऋतुराज पाटील,निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते साध्या पद्धतीने करण्यात आला. यावेळी श्री. पाटील बोलत होते. उमेदवारांची यादी जाहीर करून लवकरच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी उपस्थितांकडून ''आमचं ठरलंय, कंडका पाडायचा'' अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. पाटील गल्ली येथून या प्रचार फेरीला सुरुवात झाली. प्रमुख मार्गावरून आंबे गल्लीमार्गे पुन्हा हनुमान मंदिर येथे प्रचार फेरीची सांगता झाली. या प्रचार फेरीत कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव माने,

बाबासाहेब चौगले, बी.एच. पाटील, उदयानी साळुंखे, विजयमाला नेजदार, शशिकांत खोत, एस आर पाटील (चिखली), मोहन सालपे, डॉ. संदीप नेजदार, हिंदुराव ठोंबरे, मधुकर चव्हाण, उत्तम सावंत, सचिन चौगले (वडणगे), किरण भोसले, बाबूराव बेनाडे, विठ्ठल माने, धनाजी चौगुले, अण्णा रामांना, निर्मला पाटील यांच्यासह बावड्यातील श्रीराम सोसायटीचे संचालक, माजी नगरसेवक व १२२ गावांतील कार्यकर्ते सहभगी झाले होते.

महाडिकांनी केवळ स्वार्थ साधला ः सर्जेराव माने

कोल्हापूर ः ‘राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेलच्या प्रमुख उमेदवारांना अपात्र ठरविण्याचे कारस्थान म्हणजे मैदान सोडून पळ काढण्याचा प्रकार आहे. समोर पराभव दिसत असल्याने कुस्ती लागण्याअगोदरच महाडिक लंगोट टाकून मैदानातून पळाले आहेत,’ अशी टीका माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांनी केला.

राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या प्रचारार्थ नरंदे, आळते येथे झालेल्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, की गेली २८ वर्षे कारखानाची सत्ता भोगणाऱ्या महाडिकांनी आजपर्यंत केवळ स्वत:चा स्वार्थ साधला. सभासद हिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या महाडिक यांच्या या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या सभासदांनी परिवर्तनाचा ठाम निर्णय घेतला आहे. या वेळी आमदार राजूबाबा आवळे यांचेही भाषण झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff Announcement : डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी सहा देशांवर फोडला टेरिफ बॉम्ब; जाणून घ्या, आता कुणाचा नंबर लागला?

Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

SCROLL FOR NEXT