Comrade Namdev Gawade Passed Away | Kolhapur news esakal
कोल्हापूर

कॉम्रेड नामदेव गावडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

माहिती कोल्हापूर जिल्हा भाकपचे सचिव कॉम्रेड सतीश कांबळे यांनी दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

कसबा बीड - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य सहसचिव व राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य आणि महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सचिव कॉम्रेड नामदेव कल्लाप्पा गावडे (वय ६३) यांचे रात्री साडेबारा वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे दुःखद निधन झाले. आज (बुधवार २३ ) दुपारी २.३० वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बिंदू चौक, कोल्हापूर येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. ४ वाजता बीड (ता.करवीर) या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

कॉम्रेड नामदेव गावडे हे विद्यार्थी दशेपासून कम्युनिस्ट चळवळीत कार्यरत होते. दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी ऑल इंडिया युथ फेडरेशन मध्ये प्रवेश केला. १९८० साली ते जिल्हा चिटणीस झाले. सलग दहा वर्षे ते या पदावर कार्यरत होते. त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ऑल इंडिया युथ फेडरेशनचे नेतृत्व केले. कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात युवकांचे मजबूत संघटन उभे केले. याकाळात युवकांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी लढे उभारले. त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनले. त्यांनी कामगार व शेतकरी वर्गासाठी आपले आयुष्य समर्पित केले. गेल्या अनेक वर्षांपासून ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेचे नेतृत्व करत आहेत.

२००४ ते ०७ या काळात शेतकरी कर्जमाफी साठी आंदोलन केले. त्यावेळच्या काँग्रेस सरकारने सरकारने ७१ हजार कोटींची  माफी केली होती. रेशन व पेन्शन धारकांचे आंदोलन, विजेचे आंदोलन, ग्रामपंचायत कर्मचारी व आशा वर्कर्सचे आंदोलन अशा अनेक प्रश्नांवर लढे उभारून, त्यांनी हक्क मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. नुकत्याच दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनातही त्यांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली होती. कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याचे २०११ साली अध्यक्ष पद भूषिवले होते. शेतकरी प्रश्नांवर त्यांनी अनेक पुस्तिका लिहल्या आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Agrawal: कोण आहेत राजेश अग्रवाल? राज्याचे मुख्य सचिव म्हणून घेणार पदभार

Maharashtra Politics: जो ठाकरेंसोबत गेला, तो भुईसपाट झाला; मंत्री आशीष शेलार यांचा टोला

Latest Marathi News Live Update: तपोवन वाचवण्यासाठी मोठा लढा

'Virat Kohli - Rohit Sharma मुळे अनेक रात्री झोपलो नव्हतो, त्यामुळे...', २०२७ वर्ल्ड कप खेळण्यावर भारताचा प्रशिक्षक स्पष्टच बोलला

Hong Kong fire: हाँगकाँगमधील मृतांची संख्या ९४वर; शेकडो सदनिका जळून खाक, अजूनही आग आटोक्यात नाही

SCROLL FOR NEXT