festival sakal
कोल्हापूर

निपाणीत सार्वजनिक गणेशोत्सव परवान्याबद्दल संभ्रम

कार्यकर्त्यांना प्रतिक्षा : प्रशासकीय हालचाली नाहीत, सोमवारनंतर निर्णय

अमोल नागराळे

निपाणी : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी दरवर्षी येथील नगरपालिका, पोलिस व वीज खात्याकडून परवाना दिला जात होता. मात्र यंदा कोरोना (Corona) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारून मूर्ती प्रतिष्ठापनेला निर्बंध आणले आहेत. त्यामुळे यंदा मंडळांना प्रशासनाकडून मिळणार की नाही? याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनालाही याबद्दल स्पष्ट आदेश नाहीत, मात्र सोमवार (ता. ३०) नंतर परवान्याबद्दल पुढील कार्यवाही होईल, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

शहर परिसरात दरवर्षी जवळपास पाचशेहून अधिक सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होते. मूर्ती प्रतिष्ठापनेपूर्वी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱयांना प्रशासनाकडून रितसर परवाना घेण्याची सक्ती केली जाते. त्यानुसार मंडळांकडून अर्ज केल्यावर पालिका, पोलिस व वीज खात्याकडून परवाना दिला जात असे. यंदा मात्र आठ-दहा दिवसावर गणेशोत्सव आला तरी प्रशासनाला परवाना देण्याबद्दल खात्याकडून आदेश नाहीत. दुसरीकडे गणेशोत्साववर आणलेल्या निर्बंधाला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला विरोध होत आहे. केवळ मंदिरात गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचे प्रशासकीय आदेश आहेत. शिवाय मिरवणूक काढण्यास बंदी आहे.

मात्र दरवर्षीच्या ठिकाणी मंडप उभारून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यास मुभा देण्याची मागणी मंडळाच्या कार्यकर्त्यांची आहे. प्रशासन मुभा देत नसल्याने मंडळाचे कार्यकर्ते संतप्त बनले आहेत. दरवर्षी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंधरा दिवस अगोदर मंडळांना परवाना देण्यासाठी पालिका, पोलिस व वीज खात्याकडून अर्ज घेतले जात होते. यावेळी मात्र प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली नाहीत.

पालिका अधिकाऱयांना विचारल्यावर त्यांनी सोमवारी (ता. ३०) तारखेला शासन पातळीवर याबद्दल चर्चा होणार असून त्यानंतर काय निर्देश काय येतात? पहावे लागणार असल्याचे सांगितले. मात्र तरूण कार्यकर्ते उत्सव साजरा करण्यावर ठाम आहेत. गणेशोत्सव नाही तर मतदानही नाही, असा इशारा येथील श्री. गणेशोत्सव महामंडळाने दिला आहे.

यंदा केवळ मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना होईल. सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करण्याबद्दल आदेश नाहीत. तरीही सोमवारी (ता. ३०) वरिष्ठ पातळीवर यावर चर्चा करून निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- जगदीश हुलगेज्जी, आयुक्त, निपाणी नगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट कायम; बुधवारी सर्वाधिक तापमान चंद्रपुरात; अकोला, अमरावती किती?

बांगलादेशचा शकिब अल हसन मुंबईत आला; T20 World Cup मधून माघार घेणाऱ्या सरकारच्या निर्णयावर संतापला, म्हणाला...

शाळांना विद्यार्थ्यांच्या रिझल्टची घाई, मुंबईतील अनेक शाळांचे निकाल जाहीर, गुणपत्रिकाचेही वाटप; शिक्षण विभागाचे नियोजन फेल?

Karnataka Congress Crisis : कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! 15 मे रोजी डी. के. शिवकुमार घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ? आमदाराच्या दाव्याने खळबळ

Latest Marathi News Live Update: बंगळुरूत 'बोरिंग आणि लेडी कर्झन हॉस्पिटल'जवळ मोठी दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत

SCROLL FOR NEXT