Kolhapur traffic esakal
कोल्हापूर

Kolhapur : कोल्हापूर-सांगली मार्गावर कोंडी

वाहनधारकांत प्रचंड संताप ; खड्डे, साचलेल्या पाण्याने त्रेधा, आमदारही अडकले

सकाळ डिजिटल टीम

नागाव/ हातकणंगले : खड्ड्यांमुळे कोल्हापूर-सांगली महामार्गावर वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. त्याचा प्रत्यय आज पुन्हा आला. त्यातच कामानिमित्त कोल्हापूर दौऱ्या‍वर येत असणारे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची मोटार वाहतूक कोंडीत अडकली आणि ‘काय तो सांगली-कोल्हापूर रस्ता, काय ते खड्डे आणि काय ते ट्रॅफिक, सगळं कसं एकदम ओक्‍के’ अशी टर उडवली जाऊ लागली. या प्रकारामुळे हातकणंगले पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

सांगली फाटा, रामलिंग फाटा, हातकणंगले आणि तारदाळ फाटा या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होती. त्यामुळे वाहधारकांनी प्रचंड संताप व्यक्त केला.स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यावर काल (ता. १४) मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न झाला. पण, मुसळधार पावसामुळे खड्ड्यात भरलेल्या मुरमाची माती होऊन चिखल झाल्याने वाहनधारकांच्या समस्येत वाढच झाली.

महामार्गावर पुलाची शिरोली येथील सांगली फाटा येथून हातकणंगले-तारदाळ फाट्यापर्यंत या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. शिवाय, रस्त्याच्या दुतर्फा पाणी निचरा होण्यासाठी उपाययोजना नसल्याने थोड्याशा पावसामुळेही रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचते. हा महामार्ग चारपदरी आहे. पण, खड्डा चुकवून प्रवास करता येईल, असा एकपदरी रस्ताही उपलब्ध नाही. आज जयसिंगपूर येथे ‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद होती.

या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जिल्ह्यातून शेतकरी निघाले होते. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. सोलापूरचे आमदार शहाजीबापू पाटील कोल्हापूरला येत होते, तेही यात अडकले. कोंडीतून मार्ग काढणे त्यांच्यासाठीही अशक्य बनले होेते. हीच वेळ साधत समाज माध्यमावर रस्त्याबाबत जोरदार ट्रोलिंग करण्यात आले.

आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

गेल्या काही दिवसांपासून हातकणंगले शहर चोहोबाजूंनी जाम होत असून, अनेकदा बाजूच्या गावांचा संपर्कच तुटू लागला आहे. रेल्वे पुलाखाली साचलेले पाणी, ओढ्याच्या पाण्यामुळे जाम झालेला स्टेशन रोड यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली. अशांतच आज सांगली-कोल्हापूर मार्गावर हातकणंगले बसस्थानकाच्या दोन्ही बाजूंना रस्त्यांवर भलेमोठे खड्डे पडून त्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी झाली. दुतर्फा सुमारे आठ ते दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने चार ते पाच तास वाहतूक विस्कळीत झाली होती.

कोल्हापूर-सांगली महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम संबंधित कंपनीला दिलेले आहे. त्यांच्याकडून कामही सुरू झाले. पण, गेले चार दिवस पाऊस सुरू असल्याने काही अडचणी येत आहेत. मात्र, पाऊस संपताच हे काम युद्धपातळीवर सुरू होईल.

- व्ही. डी. पंदारकर, प्रकल्प संचालक, भारतीय महामार्ग प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT