kolhapur corporation  sakal
कोल्हापूर

Kolhapur Corporation : ९२ नगरसेवक बसणार कुठे?

महापालिका सभागृहात अपुरी जागा; सभेवेळी पदाधिकारी, अधिकाऱ्यांना होतेय अडचण

डॅनियल काळे

कोल्हापूर : महापालिकेच्या सभागृहात यापुढे ९२ नगरसेवक असणार आहेत. सध्याची इमारत आणि सभागृह हे अपुरे असून ९२ नगरसेवकांना बसायला सभागृहात जागा मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे. महापालिकेच्या हद्दवाढीचा विषय गाजत असताना हद्दवाढ बाजूलाच राहिली; पण आहे त्या हद्दीतील नगरसेवकांना बसायला सभागृहात जागा मिळणार नाही.

५० वर्षे झाली तरी हद्दवाढ नाही. महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासाठी प्रशस्त जागाही नाही. पूर्वीच्या महात्मा गांधी मार्केटच्या इमारतीतच आजही मुख्य कार्यालय आहे. इतक्या वर्षात मुख्य इमारतीसाठी जागा ही, नाही आणि निधीही नाही. शहरात जिल्हा परिषदेची प्रशस्त जागा आणि इमारत आहे. न्यायालयाची प्रशस्त जागा आणि इमारत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयही प्रशस्त झाले आहे. त्यासोबतच मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाची इमारत मोठी आहे. पोलिस मुख्यालय, जिल्हा पोलिस प्रमुख कार्यालय मोठ्या आणि प्रशस्त इमारतीत आहे. शहरात महापालिकेच्या अनेक जागा असताना मुख्य इमारतीसाठी मात्र अजून जागा निश्चित नाही. सध्याचे मुख्य कार्यालय बाजारगेट परिसरात आहे. वाहतुकीची कोंडी येथे प्रचंड होतो. स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नाही.

मुख्य इमातीत अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या कक्षासाठी नीट जागा नाही. सभागृह अपुरे पडते. अधिकारी आणि नगरसेवक यांच्यावर सभेसाठी अडचणीत बसायची वेळ येते. महापौरांना डायसवर जाताना अडचणीतून मार्ग काढावा लागतो. नगरसचिव आणि आयुक्तांना सभा होईपर्यंत, अडचणीतच बसावे लागते. अशातच आता ११ नगरसेवक वाढले आहेत. निवडणूक येत्या दोन चार महिन्यांत केव्हाही होईल. निवडणुकीनंतर ज्यावेळी पहिल्या महापौर पदासाठी निवडणूक होईल, त्या निवडणुकीसाठी ९२ नगरसेवकांना बसवायचे कोठे? असा प्रश्न उपस्थित होणार आहे.

सध्यस्थिती अशी

  • एकूण मतदारसंख्या ४ लाख ६९ हजार,९६४

  • नवमतदारात ५ वर्षात २० हजारांनी वाढ

  • एका प्रभागांत २० हजार ३४२ लोकसंख्या

  • एका प्रभागांत १७ हजार ४०६ मतदारसंख्या

  • २०१५ च्या तुलनेत ९४८३ मतदारांची वाढ

महापालिका निवडणूक २०२२

  • २०११ साली झालेल्या जनगणनेनुसारची लोकसंख्या

  • ५ लाख ४९ हजार २३६

  • प्रभागसंख्या- ३०, नगरसेवक -९२

महापालिका स्थापनेपासून नगरसेवक असे

नगरपालिकेचे १९७२ ला महापालिकेत रूपांतर

वर्ष नगरसेवक संख्या

१९७८ - ६०

२००० - ७२

२००५ - ७२

२०१५ - ८१

२०२१ (नव्या निर्णयानुसार) ९२

संभाव्य आरक्षण : महिला नगरसेवक- ४६ इतर मागास नगरसेवक - २५ अनूसूचित जाती नगरसेवक - १२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bike Accident: आईला घेण्यासाठी आलेल्या दोघांवर काळाचा घाला; खुलताबाद रस्त्यावर अज्ञात वाहनाची दुचाकीच्या धडक, दोन्ही मित्र ठार

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ धरणातून आज सकाळी ९,४३२ क्युसेक विसर्ग; गोदावरी खोऱ्यातील गावांना सतर्कतेचा इशारा

Nagpur Crime : महिलेला करायला लावली नग्न पूजा, व्हिडिओ बनवला अन्...नागपुरात भोंदूबाबाचा प्रताप उघड, 'असं' शोधायचा सावज

Neeraj Chopra: ऑलिंपिक पदकविजेता नीरज चोप्राची ब्रुसेल्स स्पर्धेतून माघार, पण अंतिम फेरीत दाखवणार आपला दम

Mahabaleshwar Rain Update; 'महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस'; भिलारमधील शाळेचा स्लॅब कोसळला, ग्रामस्थांची धावपळ

SCROLL FOR NEXT