kolhapur CPR admit corona positive patient due to unavailability of bed 
कोल्हापूर

बेडच्या प्रतीक्षेतच त्यांनी सोडला जीव... कोठे वाचा.....

शिवाजी यादव

कोल्हापूर :  कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना शासकीय रुग्णालयात बेडची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे आज गांधीनगरमधील एका वृद्ध व्यक्तीला सीपीआरमध्ये बेड उपलब्ध होऊ शकला नाही. अशात अत्यवस्थ असलेल्या कोरोना पॉझिटिव वृद्धाचा आज उपचाराच्या प्रतीक्षेत मृत्यू झाला.

गेल्या दहा दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह येण्याच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. कोल्हापूर शहरा बरोबर करवीर तालुक्यात ही कोरोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण लक्षवेधी आहे.गांधीनगर मध्ये जवळपास 80 हून अधिककोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यापैकीच एक कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या वृद्ध व्यक्तीला शासकीय रुग्णालयात जागा नसल्याने सीपीआर कडे पाठविण्यात आले. यात ही व्यक्ती वृद्ध असल्याने तसेच अन्य काही गुंतागुंतीचे आजार असल्याने गंभीर अवस्थेत सीपीआरमध्ये आणली होती.

मात्र सीपीआर रुग्णालयात 200 बेड कोरोना बाधितांवर उपचारासाठी ठेवले आहेत येथे 272 बाधितांवर उपचार होत आहेत.अशा स्थितीत नवीन कोरोमा  पॉझिटिव्ह रुग्ण दाखल करून घेणे मुश्कील होत आहे त्यानुसार गांधीनगर मधून आलेल्या या वृद्ध व्यक्तीला उपचार करण्यासाठी येथे उपलब्ध झाला नाही यात जवळपास दीड तासांची प्रतीक्षा झाली. कालावधीत या वृद्धाचा मृत्यू झाला.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचे गांभीर्य तसेच कोरोना बाधित यांवर उपचार करण्यासाठी तांत्रिक पातळीवर येत असलेल्या मर्यादा उघड झालेले आहेत. 

याबाबत राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर आरती घोरपडे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, सीपीआरमध्ये कोरोना बाधितांवर उपचार होतात मात्र सध्या बेड कमी पडत आहेत अशा नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचारासाठी आणताना पूर्वकल्पना दिलेली नसावी त्यामुळे बेड उपलब्ध  करणे शक्य झाले नसावेत.


संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT