Crime Sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : १० लाखांची लाच स्विकारताना ‘एलसीबी’चे दोन पोलिस जाळ्यात

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या दोन पोलिस कर्मचारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कारवाईची भिती दाखवून १० लाख रूपये लाच स्विकारणारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या दोन पोलिस कर्मचारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय केरबा कारंडे (वय ५०, रा. उचगाव, चौगले पार्क, टेंबलाईवाडीलगत) आणि किरण धोंडीराम गावडे (वय ३७, रा. केदारनगर, मोरेवाडी, करवीर) अशी त्या संशयितांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीलगतच सापळा रचून ही कारवाई करण्यात आल्याचे उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांनी सांगितले.

याबाबत पोलिस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार वकील आहेत. त्यांच्या मुलाचा वाहने दुरूस्ती, खरेदी व्यवहाराचा व्यवसाय आहे. त्यांनी पनवेल येथून एक ‘स्पोर्टस् बाईक’ आणली होती. ते ती मोटारसायकल स्क्रॅप करणार होते. याची माहिती संशयित पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय कारंडे आणि पोलिस नाईक किरण गावडे या दोघांना मिळाली. त्यानी ती मोटारसायकल ताब्यात घेवून त्यांना गुन्हा दाखल करण्यात येईल, मोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल अशी भिती दाखवली.

या कारवाई पासून वाचायचे असेल तर एकरकमी २५ लाख रूपये द्यावे लागतील असे सांगितले. तक्रारदारांनी याबाबतची तक्रार काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. विभागाने त्याची नियमाप्रमाणे पडताळणी केली. दरम्यान तक्रारदारांनी ही रक्कम देण्यासाठी वेळ मागून घेतला. त्यानंतर पैशाची जमवाजमव केली. तक्रारदारांकडून ठरल्याप्रमाणे संशयित कारंडे व गावडे या दोघांनी १० लाखांची लाचेची रक्कम स्विकारून ती मोटारीच्या डिक्कीत ठेवली. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीलगत सापळा रचून त्या दोघांना रंगेहात ताब्यात घेतल्याचे उपअधीक्षक बुधवंत यांनी सांगितले. ही कारवाई बुधवंत यांच्यासह अमंलदार मयुर देसाई, नवनाथ कदम, विकास माने, सुनील घोसाळकर, रूपेश माने चालक सूरज अपराध आदींनी केली.

दोनदा चौकशी...

संशयितांनी तक्रारदारांच्या मुलाला १८ जानेवारीला चौकशीसाठी बोलवून घेतले. त्यानंतर सोडून दिले. लगेच दुसऱ्यादिवशीही पुन्हा बोलून घेतले. दिवसभर थांबवून सायंकाळी सोडून दिले होते अशी माहिती पुढे आली असल्याचे उपअधीक्षक बुधवंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT