Kolhapur Crime News esakal
कोल्हापूर

Kolhapur Crime : कागलमध्ये विवाहितेनं संपवलं जीवन; पतीसह सासूला अटक, लहान बाळाचा रडताना आवाज आला अन्...

Kolhapur Crime News : दहा वर्षांपूर्वी टोप येथील रागिणी ऊर्फ गीतांजली हिच्याबरोबर लग्न झाले होते. त्यांना पाच वर्ष आणि आठ महिने वयांची दोन मुले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

कुलदीप आणि त्याची आई सुशीला कामानिमित्त बँकेत गेले होते. यावेळी रागिणी आणि आठ महिन्यांचे बाळ हे दोघेच घरी होते.

कागल : येथील कल्याणी पार्कमध्ये एका विवाहितेने (Married Woman) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रागिणी ऊर्फ गीतांजली कुलदीप मातीवडर (वय २७) असे तिचे नाव आहे. या घटनेची माहिती समजताच महिलेच्या टोप येथील संतप्त झालेल्या नातेवाइकांनी कागल येथे घराची तोडफोड केली.

संबंधित महिलेला जाच करत मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेचा पती कुलदीप आणि सासू सुशीला या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल (Kagal Police) करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

कुलदीप राजाराम मातीवडर (मूळ रा. कोगनोळी, ता. निपाणी) हे पत्नी रागिनी ऊर्फ गीतांजली, दोन मुले आणि आईसह येथील कल्याणी पार्कमध्ये राहतात. कुलदीप एका खासगी कंपनीत काम करतो. त्याचे दहा वर्षांपूर्वी टोप येथील रागिणी ऊर्फ गीतांजली हिच्याबरोबर लग्न झाले होते. त्यांना पाच वर्ष आणि आठ महिने वयांची दोन मुले आहेत. कुलदीप आणि त्याची आई सुशीला कामानिमित्त बँकेत गेले होते. यावेळी रागिणी आणि आठ महिन्यांचे बाळ हे दोघेच घरी होते.

दुपारी साडेबारा वाजता कुलदीप आणि त्याची आई बँकेतील काम आटोपून घरी आली असता घराचा दरवाजा बंद दिसला. तो उघडण्यासाठी रागिणीला हाका मारल्या असता तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांना घरात लहान बाळ मोठमोठ्याने रडत असल्याचा आवाज आला. त्यामुळे कुलदीपने घराचा दरवाजा धक्के मारून उघडला. यावेळी रागिणीने घरातील छताच्या फॅनला गळफास लावून घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कुलदीपने या घटनेची माहिती कागल पोलिसांसह रागिणीच्या नातेवाइकांना दिली. पोलिस घटनेची माहिती घेत असतानाच रागिणीचे टोप येथील नातेवाईक घटनास्थळी आले.

रागिणीचा मृतदेह पाहून तिच्या नातेवाइकांनी मोठा आक्रोश केला. यावेळी संतप्त झालेल्या तरुणांनी कुलदीपच्या घरात तोडफोड केली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता कागल ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी रागिणीचे चुलते बापूसो पवार यांनी कागल पोलिसांत फिर्याद दाखल केली. घटनास्थळी करवीरचे विभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर व पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी भेट दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक वैभव जमादार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT