Hospital esakal
कोल्हापूर

Kolhapur Crime : ‘ती’ दोन अर्भके बाहेरून आणलेली

अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित : चौकशी समिती स्थापन, सोमवारी अहवाल होणार जाहीर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : छत्रपती प्रमीलाराजे रुग्णालयात (सीपीआर) आढळून आलेली दोन मृत अर्भके ही बाहेरून आणून टाकल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. याला राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांनी दुजोरा दिला आहे. अर्भकाच्या हातात असलेला बॅण्ड आणि एक हॅण्डग्लोज मिळाले असून ते खासगी रुग्णालयातील असण्याची शक्यता आहे. तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू असल्याचेही डॉ. दीक्षित यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

दरम्यान, अर्भके प्रकरणी सीपीआर प्रशासनाने चौकशी समिती नियुक्त केली आहे. त्याचा अहवाल सोमवारी (ता.२४) जाहीर केला जाणार आहे. त्यातून ही अर्भके नेमकी कोठून आली हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. डॉ. दीक्षित म्हणाले की,‘ सीपीआरमध्ये आढळून आलेल्या अर्भक प्रकरणात प्रशासनाने चौकशी समिती नियुक्त केली आहे. पण तूर्त मिळालेल्या माहितीनुसार ही अर्भके बाहेरून आणून टाकल्याची शक्यता आहे. कारण सीपीआरमध्ये मृत झालेल्या अर्भकाची नोंद होते.

त्याच्यावर अंत्यसंस्कार झाल्यावर झाल्याची माहिती सीपीआर प्रशासनाला द्यावी लागते. त्यानंतर गर्भवती महिलेला डिस्चार्ज दिला जातो. या नोंदी तपासल्या आहेत. त्यामुळे ही अर्भके सीपीआरमधील नसल्याचे स्पष्ट होते. सीपीआरमध्ये मृत झालेल्या अर्भकाची नोंद होतेच, त्या सोबत अनावश्‍यक गर्भधारणेतील अर्भक असल्यास आणि त्याचा मृत्यू झाला असल्यास काळजी घेऊन अधिकृत वैद्यकीय कचरा संकलन प्रशासनाकडे दिले जाते. याचीही नोंद ठेवली जाते.

सीसीटीव्हीचे फुटेज तपासले

ती अर्भके ही सीपीआरमधील आहे की बाहेरची आहेत. याचा तपास पोलिसांसह सीपीआर प्रशासनाकडून सुरू आहे. सीपीआर प्रशासनाने तेथील सीसीटीव्हीचे फुटेजही पाहिले आहे. त्यामध्ये बाहेरून एखादी व्यक्ती आल्याचे दिसते. मात्र ती कोण आहे, त्यानेच ही अर्भके टाकली आहेत का? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्याचाही तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात बंद; निफ्टी 25,000 च्या जवळ, कोणते शेअर्स घसरले?

Latest Marathi News Live Update : नवी मुंबई विमातळामुळे देशाचा जीडीपी वाढणार : देवेंद्र फडणवीस

Navi Mumbai: नवी मुंबईत स्वतंत्र पोलीस ठाण्याला मंजुरी, कुठे आणि का? जाणून घ्या...

Viral News: दारू पिणाऱ्यांनाच जास्त डास चावतात का...? काय आहे व्हायरल सत्य

घटस्फोटानंतर तब्बल 14 वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीने पुन्हा बांधली लग्नगाठ; नवरा करतो 'या' क्षेत्रात काम

SCROLL FOR NEXT