कोल्हापूर

कोल्हापुरात 'कडक' निर्बंध; दोन हजार पोलिस रस्त्यावर

. शहरात 14 ठिकाणी नाका बंदी; 600 होमगार्ड अतिरिक्त

लुमाकांत नलवडे : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या कडक निर्बंधाची कोल्हापुरात कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. विशेषतः ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या प्रवेश मार्गावर पोलिसांनी नाका बंदी केली असून तेथेच चौकशीचा सपाटा पोलिसांनी लावला आहे. खाद्यपदार्थांच्या हातगाड्या सुरू असल्या तरीही त्यांना अत्यल्प प्रतिसाद आहे. रिक्षा वाहतुकासाठी परवानगी असून केवळ दोनच प्रवासी घेण्याची मुभा आहे. मात्र रिक्षा चालकांनाही अडीच-तीन तासांच्या प्रतिक्षेनंतर एकादा ग्राहक मिळत आहे. विशेष करून तोही लस घेण्यासाठी जात असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात सुमारे दोन हजार पोलिस रस्त्यावर आहेत. शहरात 14 ठिकाणी नाका बंदी केली आहे. पोलिसांना सहकार्य करण्यासाठी 600 होमगार्ड अतिरिक्त दिले आहेत. शहरातून आत येणाऱ्यांना रोखण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिस निरीक्षक स्वतः रस्त्यावर थांबून वाहनचालकांची चौकशी करीत आहेत. दंड करणे हा उद्देश नसून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना चाप बसविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे वाहतूक शाखेच्या निरीक्षक स्नेहा गिरी यांनी सांगितले. प्रत्येकांची कारणे ऐकून ते पटले तरच वाहनधारकांना पुढे सोडले जाते अन्यथा त्यांना शहरात फिरू दिले जात नाही. आज केवळ ताकीद दिली जात आहे. मात्र काहींची वाहने जप्त केली जाणार आहेत. यासाठी पोलिसांनी सर्व तयारी केली आहे.

आज सकाळी कळंबा, इंदिरा सागर चौक, व्हिनस कॉर्नर, दाभोळकर चौक, अशा शहराच्या प्रमुख मार्गावर पोलिसांनी वाहनधारकांची वाहने अडवून त्यांच्याकडे चौकशी केली. अत्यावश्‍यक सेवेतील व्यक्तींना मात्र कोणीताही त्रास होणार नाही याचीही दक्षता पोलिसांकडून घेतली जात आहे. तसेच मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एस.टी.बससेवा सुरू असून अत्यावश्‍यक असलेल्या व्यक्तींना ठिकठिकाणी सोडण्यासाठी महामंडळाची सेवा सज्ज आहे. तसेच सध्या मोफत असलेल्या शिवभोजनासाठीही नागरिकांच्या रांगा शहरात दिसून येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT