health news Risk of heart attack with noise at 45 decibels kolhapur sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : ४५ डेसिबलवर आवाजाने हृदयविकाराचा धोका

ध्वनी मर्यादा ठेवणे गरजेचे

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोणत्याही ध्वनियंत्रणेचा ४५ डेसिबलवर निर्माण होणाऱ्या ध्वनिलहरी बाळापासून ते वयोवृद्धांपर्यंत हृदयविकाराचा धोका वाढवू शकतात. अशा ध्वनिलहरी कानावर पडल्या तर हृदयविकाराची लक्षणे तीव्र होऊन संबंधिताच्‍या जीवाला धोका होतो. अशा यंत्रणेचा ध्वनी मर्यादित ठेवणे हाच हृदयविकार टाळण्यासाठीचा पर्याय आहे, असे मत तज्‍ज्ञांकडून सांगण्यात आले.

सिस्टीम यंत्रणेचा मर्यादित आवाज ठेवून वापरता येतील; मात्र अनेकदा तांत्रिक क्लुप्त्या वापरल्या जातात. त्यातून एकाच परिसरात असे आवाज घुमत राहतात. या आवाजाचा परिसरातील घरे, तसेच रुग्णालयांतील रुग्णांना सहन करावा लागतो. यात रुग्ण, लहान बाळ, गरोदर माता व ज्येष्ठ, व्याधीग्रस्त अशा रुग्णांच्या कानावर ध्वनिलहरी जास्त वेळ आदळत राहिल्याने त्यांना त्रास होतो.

हृदयात मर्यादित नैसर्गिक दाब सोसण्याची क्षमता असते; मात्र मोठ्या ध्वनी यंत्रणांचे ६० डेसिबलवर लहरी जास्त वेळ ऐकण्यात आल्यास हृदयाचा दाब वाढतो. नाडीचे ठोके वाढतात. रुग्ण अस्वस्थ होतो. त्यापुढे रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे अशी लक्षणे दिसतात.

मोठ्या आवाजापासून दूर राहणे चांगले

डॉ. बाफना म्हणाले, ‘‘लहान बाळांची हृदयाची क्षमता मर्यादित असते. वयोवृद्ध व्यक्ती अथवा व्याधीग्रस्त व्यक्तींच्या हृदय क्षमता कमकुवत झालेली असते, अशा व्यक्तींसाठी ध्वनी यंत्रणांचा मोठा आवाज अधिक धोकादायक ठरतो. काही वेळा तो त्यांच्या जीवाला धोका निर्माण करतो. अशा आवाजापासून लहान बाळ व वयोवृद्ध, व्याधीग्रस्त व्यक्ती आणि दूर राहणे महत्त्वाचे आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: २,४,६,४,४,१, ४! प्रियांश आर्यने ७ चेंडूंत राजस्थानला झोडले; जोफ्रा आर्चर कर्णधार रियानवर संतापला, नेमकं काय घडलं?

नायिका म्हणून गाजवलं दशक, आता ९ वर्षांनंतर पुन्हा मराठी सिनेमात! निशिगंधा वाड यांचं चित्रपटसृष्टीत कमबॅक

Latest Marathi News Live Update : उष्माघातापासून वाहनचालकांना दिलासा, उद्यापासून बदलापुरातील सर्व सिग्नल दुपारी बंद राहणार

IMD Yellow Alert Maharashtra : विदर्भाला उष्णतेपासून दिलासा! उद्यापासून पूर्वमोसमी पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना Yellow Alert, मराठवाडा-पुण्यात काय स्थिती?

शैलजा ते शैलेश... राजश्री देशपांडेचा थक्क करणारा प्रवास! 'बाप्या' चित्रपटाचा ट्रेलर एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT