The Kolhapur district administration has made such preparations to fight against Corona 
कोल्हापूर

कोरोना विरोधात लढण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने अशी केली आहे तयारी

सुनील पाटील

कोल्हापूर: जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील 19 कोरोना काळजी केंद्रांत आणखी 2338 बेडची सोय केली आहे. केंद्रांतील कामकाज प्रभावीपणे होण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रासाठी आरोग्य आधिकारी डॉ. दिलीप पाटील, नगरपालिका क्षेत्रासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील आणि ग्रामीण भागासाठी आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. 
श्री. देसाई म्हणाले, ""कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक योजना म्हणून नवीन कोविड काळजी स्थापन करावीत. बेडची क्षमता वाढवावी, संस्थांची दुसऱ्या टप्प्यात कोरोना काळजी केंद्र म्हणून निवड केली या केंद्राचे कामकाज तातडीने सुरू करण्याविषयी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. केंद्रातील कामकाजासाठी तांत्रिक मार्गदर्शन व साहाय्य करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांच्याही नियुक्ती केली आहे. 

करवीर व कोल्हापूर शहर : 
शिवाजी विद्यापीठ वसतिगृह 1 आणि 2 प्रत्येकी 150 बेड. वसतिगृह 3 मध्ये 300 बेड. तंत्रशास्त्र विभाग- 300 बेड. आयसोलेशन रुग्णालय व आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, अंडी उबवणी केंद्र, कृषी महाविद्यालय वसतिगृह (पदवी आणि पदव्युत्तर), राजर्षी शाहू पब्लिक स्कूल, कुरुकली प्रत्येकी 100 बेड सोय केली आहे. 

जिल्ह्यातील सेंटरनिहाय उपलब्ध बेड
कागल ः कोगनोळी कोविड सेंटर 150 
भुदरगड : संत बाळूमामा मंदिर रुग्णालय- 150 
शिरोळ : डॉ. जे. जे. मगदूम वैद्यकीय महाविद्यालय 60 
जयसिंगपूर ः डॉ. एम. सी. मोदी होमिओपॅथी रुग्णालय 90 
हातकणंगले : संजय घोडावत वसतिगृह 100 
पन्हाळा : संजीवन महाविद्यालय -128 
वारणानगर ः महात्मा गांधी रुग्णालय 150 
कोडोली ः डॉ. पाटील आयुर्वेदिक रुग्णालय 75 
शाहूवाडी : प्राथमिक आरोग्य केंद्र शित्तूर 40 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unclaimed Money : आपला पैसा परत मिळवा! मोदी सरकार देत आहे बँक, विमा आणि म्युच्युअल फंडमधील विसरलेले पैसे, जाणून घ्या कसे मिळणार

Ram Mandir: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दुसरा वर्धापन दिन ३१ डिसेंबरला; उप-मंदिरांवर फडकवले जाणार ध्वज

Viral Video: भिकारी वाटणाऱ्या व्यक्तीने अचानक फाडफाड इंग्रजी बोलताच लोक अवाक्, कोण आहेत हे आजोबा ? पाहा व्हायरल व्हिडिओ

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा 'सुरक्षित आणि हरित' होणार! आयुक्त शेखर सिंह यांची माहिती; स्वयंसेवी संस्थांशी झाली बैठक.

पॉर्नस्टार होण्यासाठी पतीचं कृत्य, पत्नीचा १३ मिनिटांचा 'तो' VIDEO केला सोशल मीडियावर शेअर; ७ महिन्यांपूर्वीच झालंय लग्न...

SCROLL FOR NEXT