कोल्हापूर

'कोल्हापुर जिल्ह्यातील सर्व व्यवसाय शुक्रवार पासून सुरू होणार'

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapurlockdown update) शहराच्या धर्तीवर जिल्ह्यातील इतर सर्व ठिकाणचे व्यवसाय शासनाच्या अटीस अधीन राहून शुक्रवारपासून सुरू करावेत असा आदेश राज्य शासनाने कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला दिला आहे. ही माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rajendra patil-Yadravkar) यांनी आपल्या ट्विटर अकौंटवरून दिली आहे.(kolhapur-district-all-shop-open-from-friday-rajendra-patil-Yadravkar-kolhapur-lockdown-update)

ज्या विभागामध्ये बाधित रुग्णांची संख्या कमी आहे, अशा जिल्ह्यातील सर्व शहरे आणि गावांमधील छोटे-मोठे व्यवसाय सुरू व्हावेत यासाठी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यड्रावकर यांनी केलेल्या या प्रयत्नाला यश आले असून शुक्रवारपासून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांना आपले व्यवसाय उद्योग सुरू करण्यास मुभा मिळणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र कोल्हापूर शहर वगळता जिल्ह्यातील अन्य सर्व व्यवसाय सुरु करण्यास प्रशासनाने परवानगी दिली नव्हती. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात संतापाचे वातावरण होते. इचलकरंजी, जयसिंगपूर, पेठ वडगाव यासह जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये संघटनांनी शुक्रवारपर्यंत निर्णय न झाल्यास प्रशासनाचा आदेश डावलून सर्व व्यवसाय सुरू करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे वातावरण संघर्षमय बनण्याची शक्यता होती. या पार्श्‍वभूमीवर मंत्री यड्रावकर यांनी आज भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या मंत्रिमंडळात कोण इन, कोण आउट? संभाव्य यादी समोर; महाराष्ट्रातूनही 'हे' नाव चर्चेत, धर्मेंद्र प्रधानांचं खातं कुणाला?

Chhatrapati Sambhajinagar: घाटीची वाटचाल कॉर्पोरेटकडे ; १७ वर्षांनंतर ट्रॉमा आयसीयूचा कायापालट; वॉर्ड २९ चे लोकार्पण

Satyajeet Tambe: पेपरफुटीने महाराष्ट्रातील परीक्षा व्यवस्थेचा बुरखा फाडला: आमदार सत्यजित तांबे; ४ लाख २८ हजारांहून उमेदवारांवर अन्याय

Latest Marathi News Update : खिद्रापूरमध्ये कोपेश्वर मंदिर बंद; अतिक्रमण वादावर ग्रामस्थांचे साखळी उपोषण

Sankashti Chaturthi : श्रीगणेश उपासना, वटवृक्ष आणि आत्मचैतन्याचा जीवनसाधनेशी असलेला गूढ संबंध

SCROLL FOR NEXT