Kolhapur District Congress's protest against the Agriculture and Labor Act 
कोल्हापूर

शेती, कामगार कायद्याच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेसची धरणे

सुयोग घाटगे

कोल्हापूर : केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेले शेती विधेयक आणि कामगार विधेयक हे कामगार आणि कष्टकरी वर्गाच्या हिताचे नसून याचा विरोध करण्यासाठी पापाची तिकटी, येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर कॉंग्रेसने आज धरणे आंदोलन व निदर्शने केली. 
यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, महापौर निलोफर आजरेकर, प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस देविदास भन्साळी उपस्थीत होते. 
गांधी जयंती निमित्त कॉंग्रेसच्या वतीने शेतकरी व कामगार बचाव दिवस म्हणून पाळण्यात येत आहे. या निमित्ताने पापाची तिकटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जिल्हा व शहर कॉंग्रेस, युवक कॉंग्रेस महिला कॉंग्रेसच्या वतीने केंद्र सरकार विरोधात धरणे आंदोलन व निदर्शने केली. हे कायदे शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे कंबरडे मोडणारे असल्याचे सांगण्यात आहे. तसेच उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटनेचा निषेध नोंदवत न्यायाची मागणी करण्यात आली. 
यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, ""भाजप सरकार हे शेतकरी आणि कामगार विरोधी सरकार आहे. कामगारांच्या आणि शेतकरी वर्गाच्या अडचणी वाढवण्याचे निर्णय घेण्याचे काम हे सरकार करत आहे. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदा मागे घ्यावा. अन्यायी कायद्यातून शेतकरी कष्टकऱ्यांची सुटका होईल. युवक कॉंग्रेसचे दिपक थोरात, सचिन चव्हाण, शोभा कवाळे, सुरेश कुऱ्हाडे, संध्या घोटणे, वैशाली महाडीक, अश्विनी धोत्रे, सुनील पवार, संदीप पाटील, पार्थ मुंडे, बायजी शेळके आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT