कोल्हापूर

राज्यात उसाला सर्वाधिक दर; कोल्हापुरातील तब्बल आठ कारखाने महाराष्ट्रात 'अव्वल'

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: यावर्षी संपलेल्या साखर हंगामात (Sugar season)राज्यात उसाला सर्वाधिक दर दिलेल्या पहिल्या दहा साखर कारखान्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल आठ कारखान्यांचा समवेश आहे. उर्वरित दोन कारखाने सांगली जिल्ह्यातील (Sangli)आहेत. राज्यात सर्वाधिक प्रतिटन ३१७६ रुपये दर सोनहिरा (कडेगांव-सांगली) कारखान्याने दिला आहे तर त्या खालोखाल कोल्हापुरातील कुंभी कासारी कारखान्याने(Kumbhi Kasari Factory)प्रतिटन ३११९ रुपये दर देऊन राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे.Kolhapur-district-Eight-factories-are-the-top-ten-sugar-mills-in-the-state-kolhapur

दरम्यान, साखर उताऱ्यातही कोल्हापूरने बाजी मारली असून सर्वाधिक साखर उतारा असलेल्या राज्यातील पहिल्या दहा कारखान्यात जिल्ह्याती तब्बल सात कारखान्यांचा समावेश असून ‘दत्त-दालमिया’ खासगी कारखान्याने सहकारी साखर कारखान्याने मागे टाकत यावर्षीच्या हंगामात राज्यात सर्वाधिक १३.३९ टक्के उतारा मिळवला आहे.

उतारा जास्त असलेल्या अन्य कारखान्यात कोल्हापूरच्या पंचगंगा-इचलकरंजी, बिद्री-कागल, ओलम ॲग्रो-चंदगड, मंडलिक-हमीदवाडा, कुंभी-कुडित्रे व गगनबावडा तालुक्यातील डॉ. डी. वाय. पाटील कारखान्याचा समावेश आहे.यावर्षी राज्यातील १९० कारखान्यांनी हंगाम घेतला होता. या कारखान्यांचा हंगाम काल (ता. २७) संपला. यावर्षी राज्यात १०१२ लाख टन गाळप होऊन १०६.३ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात २२ कारखान्यांनी १५० लाख ७५ हजार टन ऊस गाळप करून १ कोटी ८२ लाख १७ हजार ८२० क्विंटल साखर उत्पादन केले आहे.

राज्यात सर्वाधिक ऊस बिलाची रक्कम अदा केलेल्या पहिल्या दहा कारखान्यात कोल्हापूरातील जवाहर-हुपरी, दत्त-दालमिया, दत्त-शिरोळ व शाहू-कागल या चार कारखान्यांचा समावेश आहे. यातील जवाहर कारखान्याने राज्यात उच्चांकी ५२, ८६८ लाख रुपये ऊस बिलापोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. राज्यात सर्वाधिक गाळप, सर्वाधिक साखर उत्पादन, सर्वाधिक साखर उतारा व सर्वाधिक ऊस दर देण्यात कोल्हापूरचेच कारखाने आघाडीवर आहेत.

राज्यात सर्वाधिक दर दिलेले कारखाने असे

जिल्हा कारखान्याचे नाव प्रत्यक्ष दिलेला दर (प्रतिटन रुपये)

सांगली सोनहिरा-कडेगाव ३१७६

कोल्हापूर कुंभी-कुडित्रे ३११९

कोल्हापूर बिद्री-कागल ३०७५

सांगली निनाईदेवी-शिराळा ३०५३

कोल्हापूर पंचगंगा-इचलकरंजी ३०४०

कोल्हापूर ओलम-चंदगड २९८५

कोल्हापूर शाहू-कागल २९७२

कोल्हापूर भोगावती-परिते २९७२

कोल्हापूर कोरे-वारणानगर २९५१

कोल्हापूर गायकवाड-बांबवडे २९००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT