kolhapur district First in country in National Biogas 
कोल्हापूर

राज्यातच नाही तर कोल्हापूरने पटकावला देशातही पहिला क्रमांक 

निवास चौगले

कोल्हापूर - राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात आणि देशातही प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि कृषी समितीचे सभापती सतीश पाटील यांनी आज ऑनलाईन झालेल्या कृषी समितीच्या बैठकीत दिली. 

राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रीय खत व्यवस्थापन कार्यक्रमात जिल्ह्यात 1010 संयंत्रे बाधून प्रथम क्रमांक मिळावला. राज्य शासनाने दिलेले शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल आजच्या सभेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्व पदाधिकारी, कृषी समितीचे सदस्य, तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव केला. 

कृषी समितीकडील 2020-21 मधील विविध योजनांसाठी 2 कोटी 52 लाख रुपये सुधारित वाढीव तरतुदीला आजच्या सभेत मंजुरी दिली. गेल्यावर्षी 31 जुलै 2020 अखेर योजनेतून साहित्य खरेदी केलेल्या लाभार्थ्यांनी खरेदी बिले पंचायत समिती स्तरावर सादर केली आहेत, अशाच लाभार्थ्यांना 10 सप्टेंबरपर्यंत अनुदान खात्यावर जमा करण्याचे आदेश सभेत दिले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना कृषी अधिकाऱ्यांनी माहिती देऊन जास्तीत जास्त लाभार्थी निवडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सभेला कृषी उपसंचालक भाग्यश्री पवार-फरांदे, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा कृषी अधिकारी लतिफ शेख, कृषी समिती सदस्या सौ. कल्पना चौगुले, करवीर सभापती सौ. अश्‍विनी धोत्रे आदी उपस्थित होते. 

पीक स्पर्धेतील विजेते असे 
राज्य पातळीवरील सोयाबीन पीक स्पर्धेत शहाजी रंगराव पाटील (रा. तासगांव, ता. हातकणंगले) यांनी पहिला तर सुशिला अरुण कुंभार व सौ. अनिता मच्छिंद्र कुंभार (दोघीही भादोले, ता. हातकणंगले) यांनी अनुक्रम दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. भात पीक स्पर्धेत राज्यात सुळकुड (ता. कागल) येथील बाबूराव आप्पाजी परिट यांनी दुसरा तर मलगोंडा सातगोंडा टेळे यांनी तिसरा क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांच्याही अभिनंदनाचा ठराव सभेत केला. 

 संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : ही लोकशाहीची हत्या : संजय राऊत

Theatre and Memories : नाटक संपतं, पण वस्तूंच्या आठवणी राहतात; ‘बेगम बर्वे’पासून ‘गोदो’पर्यंतचा रंगानुभव

SCROLL FOR NEXT