Kolhapur district had the highest hsc result in Kolhapur division 
कोल्हापूर

बारावी परीक्षेत मुलीच भारी ; कोल्हापूर विभागाचा निकाल 92.42 टक्के

युवराज पाटील

कोल्हापूर - फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला. कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वाधिक म्हणजे 93.11 टक्के इतका निकाल लागला. सातारा जिल्ह्याचा 92.18 टक्के तर सांगली जिल्ह्याचा 91.63 टक्के इतका निकाल लागला. कोल्हापूर विभागाचा एकूण निकाल 92.42 टक्के इतका आहे. तीन्ही जिल्ह्यात मिळून 162 केंद्रावर ही परीक्षा झाली. कोल्हापूर विभाग राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दरवर्षीप्रमाणे मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक असून ते 96.57 टक्के इतके आहे. एकूण 55 हजार 814 पैकी 53 हजार 900 इतक्‍या मुली उत्तीर्ण झाल्या. 68 हजार 444 पैकी साठ हजार 569 इतकी मुले उत्तीर्ण झाली. हे प्रमाण 89.01 टक्के इतके आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या निकालात 5.33 टक्के इतकी वाढ झाली आहे.

कोल्हापूर विभागातील तीन जिल्ह्यात परीक्षा काळात गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या चाळीस विद्यार्थ्यांवर त्या त्या विषयाची कारवाई झाली आहे. एका विद्यार्थ्याला चौकशीत दोषी आढळल्याने पुढे पाच वर्षे त्याच्यावर परीक्षेसाठी बंदी घातली आहे.ज्या विद्यार्थ्यांना पुनर्मुल्यांकनासाठी फोटो कॉपी हवी आहे, त्यांनी बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. त्याचे शुल्कही ऑनलाईन भरावे, असे आवाहन कोल्हापूर विभागीय मंडळाचे प्रभारी अध्यक्ष सुरेश आवारी यांनी केले आहे.

संपादन - मतीन शेख

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup AFG vs SA : लाईव्ह सामन्यात काय घडलं? डॅनी मॉरिसन अन् महिला समालोचकाचा ‘तो’ 8 सेकंदांचा Video व्हायरल

नंदिनीच्या आवाजाला झालंय तरी काय? 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये मृणालचा आवाज डब केलाय? प्रोमो पाहून नेटकऱ्यांचा प्रश्न

Horscope : उद्या महासंयोग! 'या' 5 राशींसाठी 12 फेब्रुवारी ठरेल टर्निंग पॉइंट; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा एकाच दिवशी येणार

Narendra Modi: अमेरिकेसोबत मोदींचा आणखी एक करार? राफेलपेक्षा दुप्पट महाग विमानांची खरेदी

Ranji Trophy: मुंबईचं स्पर्धेतून बाहेर, तर जम्मू-काश्मीरने रचला इतिहास; सेमीफायनलचे चार संघ निश्चित, पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT