kolhapur district milk dairy gokul 
कोल्हापूर

निवडणुकीविरोधात "गोकुळ' न्यायालयात 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असलेल्या संस्था वगळून इतर संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्याच्या सहकार प्राधिकरणाच्या आदेशा विरोधात कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्यावतीने (गोकुळ) आज उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. यावरील सुनावणी सोमवारी (ता. 8) आहे. 

दरम्यान, उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या संस्थांच्या निवडणुकांना कोरोनाचा धोका नाही का ? असा सवाल यापुर्वीही उपस्थित झाला होता. या पार्श्‍वभुमीवर या आदेशानुसार सुरू असलेल्या निवडणुकांनाही कोरोनाच्या कारणामुळे स्थगिती मिळावी, अशी मागणी "गोकुळ' ने याचिकेत केली आहे. 

कोरोनाचे कारण सांगून राज्य सहकारी प्राधिकरणाने आतापर्यंत सहावेळा सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलेल्या आहेत. 24 फेब्रुवारी रोजी शेवटचा आदेश प्राधिकरणाने काढला. त्यातही उच्च व सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या संस्था वगळून इतर संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली. यापुर्वी 4 फेब्रुवारी रोजी काढलेल्या आदेशाविरोधात काही संस्था न्यायालयात गेल्या होत्या. त्यात "गोकुळ' ची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. यावर 10 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने निकाल देताना तत्काळ निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचा आधार घेऊन "गोकुळ' ची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या निर्णयाविरोधात यापुर्वीच "गोकुळ' ने दाखल केलेली याचिका मागे घेतली, त्यामुळे "गोकुळ' च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता.

आता "गोकुळ' ने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या निवडणुकांनाच स्थगितीची मागणी केली आहे. "गोकुळ' च्यावतीने ज्येष्ठ वकिल ऍड. वाय. एस. जहांगीरदार यांनी ही याचिका दाखल केली. सोमवारी (ता. 8) यावर निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 


  संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT