खासगी सावकारी Esakal
कोल्हापूर

Kolhapur : जिल्ह्यात सावकारी पाश वाढतोय

वसुलीसाठी दादागिरी; व्याजापोटी अनेकांचे कंबरडे मोडले

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : एक लाख रुपये कर्ज म्हणून द्यायचे, देतानाच त्यातील दहा हजार व्याजापोटी कापून घ्यायचे आणि पुन्हा महिन्याला दहा हजारांच्या मागणीसाठी संबंधितांच्या घरी जायचे. अशा पद्धतीने शहर आणि परिसरात खासगी सावकारांचेच पेव फुटले आहे. घेतलेल्या पैशाचे व्याज भरूनच अनेक मेटाकुटीला आले असताना त्यांच्यावरच सावकारांकडून दादागिरी सुरू आहे.

पंधरा दिवसांपूर्वी शहराला लागून असलेल्या एका गावात व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी घर बळकावण्याचा झालेला प्रयत्न, राजारामपुरीत अशा व्यवहारातून पैशासाठी कुटुंबाला झालेली माराहाण, असे प्रकार पाहता जिल्ह्यात पुन्हा एकदा सावकारी पाश वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. व्याजासह मुद्दल देऊनही सावकारांचा ससेमिरा सुरूच आहे.

६२ सावकारांवर छापे

गेल्या दोन वर्षांत सहकार विभागाने ६२ सावकारांवर छापे टाकले. यात बहुतांशी सावकार परवाना नसलेले आहेत. यापैकी १६ जणांवार गुन्हा नोंदवण्यात आला, तर इतर प्रकरणात अजूनही चौकशी सुरू आहे. कारवाईतून सावकारांनी व्याजापोटी बळकावलेली साडेतीन एकर जमीन व दोन चारचाकी गाड्या संबंधित कर्जदाराला परत करण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT