Ichalkaranji Municipality Sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : पालिकांवर प्रशासकांची नियुक्ती; राज्य शासनाचा आदेश

अद्याप या पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका न झाल्यामुळे नविन सभागृह अस्तीत्वात आलेले नाही. त्यामुळे या सर्व पालिकांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पंडित कोंडेकर

इचलकरंजी : जिल्ह्यातील (Kolhapur district News) आठ पालिकांच्या विद्यमान सभागृहाची मुदत 29 डिसेंबर रोजी तर पन्हाळा पालिकेची मुदत ३० डिसेंबर रोजी संपणार आहे. मात्र अद्याप या पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका न झाल्यामुळे नविन सभागृह अस्तीत्वात आलेले नाही. त्यामुळे या सर्व पालिकांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश आज राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीसह पाच पालिकांमध्ये मुख्याधिका-यांचीच प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तीन पालिकांची प्रशासकपदाची जबाबदारी प्रांताधिकारी यांच्याकडे तर कागल पालिकेचा कार्यभार तहसिलदार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

पुणे विभागातील एकूण ४१ पालिकांच्या विद्यमान सभागृहाची मुदत २९ डिसेंबर ते १७ फेब्रुवारी या कालावधीत संपणार आहे. मात्र अद्याप या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका झालेल्या नाहीत. अथवा निवडणूक कार्यक्रम देखील जाहीर झालेला नाही. सध्या केवळ कच्ची प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे. मात्र ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबीत पडल्यांने पालिकांच्या सार्वत्रिक निवडणूका कधी होतील, याबाबत अनिश्चीतता आहे. तसेच ओमिक्रॉनच्या नव्या संकटाचे सावटही आहे. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. त्यामुळे विद्यमान सभागृहाची मुदत संपणा-या पालिकांवर प्रशासक नियुक्तीचा विषय चर्चेत आला होता.

राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार याबाबतचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून काढण्यात आला आहे. प्रधान सचिव महेश पाठक यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या या आदेशात पूणे विभागातील पूणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ४१ पालिकांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये बहुतांशी पालिकांमध्ये मुख्याधिकारी यांच्याकडेच प्रशासकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर कांही पालिकांमध्ये प्रांताधिकारी व तहसिलदार यांच्याकडे प्रशासकपदाचा कार्यभार देण्यात आला. विद्यमान सभागृहाची मुदत संपल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर संबंधित प्रशासक पदाचा कार्यभार घेणार आहेत.

कोल्हापूर जिल्हा प्रशासक नियुक्ती दृष्टीक्षेप

इचलकरंजी नगर पालिका - मुख्याधिकारी

जयसिंगपूर नगरपालिका -मुख्याधिकारी

गडहिंग्लज नगरपालिका-प्रांताधिकारी

कुरूंदवाड नगरपालिका -मुख्याधिकारी

कागल नगरपालिका -तहसिलदार

मलकापूर नगरपालिका -मुख्याधिकारी

मुरगूड नगरपालिका -प्रांताधिकारी

पन्हाळा नगरपालिका -मुख्याधिकारी

वडगांव नगरपालिका - प्रांताधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

Mumbai News : चार महिने झाले... आई अजूनही दाराकडे पाहतेय; ‘अब्दुल’ कुठे आहे?

Latest Marathi News Live Update : स्वातंत्र्यदिनानिमित्त बीबी का मकबऱ्याला मनमोहक तिरंगी रोषणाई

Stray Dogs : भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर! ठाणे जिल्ह्यात स्वतंत्र ‘डॉग शेल्टर’ उभारा

Shirur Market Committee Election : शिरूर बाजार समितीची निवडणूक तात्काळ घ्या; काँग्रेस पक्षाची मागणी

SCROLL FOR NEXT