Kolhapur district is performing well at the national level in the school competition kolhapur marathi news
Kolhapur district is performing well at the national level in the school competition kolhapur marathi news 
कोल्हापूर

कोल्हापूरचे खेळाडू लय भारी... जिंकली १४३१ पदके...

संदीप खांडेकर

कोल्हापूर - शालेय स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावर दबदबा ठेवण्यात कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडू कमी पडत नाहीत. पाच वर्षांत खेळाडूंनी १४३१ पदकांची लयलूट केली आहे. १८२ सुवर्ण, १६८ रौप्य व १२० कास्यपदके पटकावून त्यांनी टॅलेंट काय असू शकते, याची प्रचिती दिली आहे. राष्ट्रीयस्तरावर सहभागाचा आकडा लक्ष वेधणारा आहे.

मुलीचीही उल्लेखनीय कामगिरी

जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे दरवर्षी होणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धांत शाळांचा सहभागाचा आकडा वाढत आहे. महापालिकेने शाळांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा तो परिणाम आहे. सुविधांचा वानवा असल्याने महापालिका शाळा स्पर्धेत सहभागी होत नव्हत्या. महापालिकास्तरीय स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी जिल्हा क्रीडा कार्यालयातील क्रीडाधिकाऱ्यांच्या खांद्यावरच होती. ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी होऊ लागले आहेत. सुविधांची फारशी फिकीर न करता त्यांचा स्पर्धेतील परफॉर्मन्ससही डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. 
जिल्हा, विभागीय, राज्य व राष्ट्रीय या क्रमाने खेळाडूंचे कौशल्यही बहरताना दिसत आहे. राष्ट्रीय स्तरावर ते प्रतिस्पर्धी संघ वा स्पर्धक खेळाडूवर विजय मिळविण्याच्या इर्षेनेच उतरत आहेत. दरवर्षी अडीचशेहून अधिक खेळाडू राष्ट्रीय स्तरावर सहभागी होत आहेत. सांघिक व वैयक्तिक खेळांत मुलीही उल्लेखनीय कामगिरी करत शिष्यवृत्ती मिळवत आहेत.

 खेळाडूंना मिळणारी शिष्यवृत्ती

राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळविणाऱ्यास ११ हजार२५०, रौप्यपदक मिळविणाऱ्यास ८ हजार ९५०, कास्यपदक मिळविणाऱ्यास ६७५० व सहभागीस ३७५० रुपये शिष्यवृत्ती मिळते. फेब्रुवारी-मार्चपर्यंत ही शिष्यवृत्ती खेळाडूंना जिल्हा क्रीडा कार्यालयातून दिली जाते.

जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीयस्तरावर उत्तम कामगिरी करतात. त्यामागे प्रशिक्षक व त्यांचे कष्ट आहेत. शिष्यवृत्तीतून खेळाडूला आवश्‍यक साहित्य खरेदीसाठी पैसे मिळतात. राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंकडून अन्य खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी, यासाठी  पेठ वडगावला प्रशिक्षण शिबिर घेतले. त्यातून त्यांचा आत्मविश्‍वास उंचावला आहे.
- डॉ. चंद्रशेखर साखरे
जिल्हा क्रीडा अधिकारी


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT