कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांचे होणार सेरॉलॉजिकल सर्वेक्षण

नामदेव माने

कसबा बीड (जि. कोल्हापूर) :  मुंबई, पुणे शहरांबरोबर कोल्हापूर कोरोना हॉटस्पॉट बनत आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्यांवर उपचार सुरू आहेत. अनेकांनी कोरोना धसका घेतला आहे. आता कोरोनाची भीती बाळगण्याची गरज नाही. कारण उपचार घेणाऱ्या लोकांपेक्षा अनेक लोकांना कोरोना होऊन गेला आहे, हे कळलेलेही नाही. यासाठी मुळचे कोल्हापूरचे असणारे डॉ. धनंजय लाड यांची क्रोम क्‍लिनिकल रिसर्च ऍन्ड मेडीकल टुरिझम ही कंपनी जिल्ह्यात 1000 लोकांचा कोरोनाचे प्रतिपिंड (अँन्टी बॉडीज) चाचणी सर्वेक्षण (सेरॉलॉजीकल सर्वेक्षण) करणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कल्लशेट्टी यांनी क्रोमला सर्वेक्षण प्रकल्प करण्यास सांगितले आहे. 

शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची नैतिक समिती (एथिक कमिटी) व भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था आयसीएमआर यांच्या मान्यतेचे सोपस्कारही पूर्ण झाले आहेत. त्यानुसार ना नफा ना तोटा या तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्याचा संकल्प आहे. 
सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्याचा खर्च सुमारे वीस लाख रुपये इतका आहे. एवढा खर्च करणे सध्या शक्‍य नसल्यामुळे डॉ. लाड यांनी विविध सामाजिक संस्था, उद्योजक व दानशूर व्यक्तींकडून निधी उभारुन हा प्रकल्प तातडीने राबवावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. 

कोल्हापुरात आजअखेर 17 हजारांहून अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यावर शासनाचा कोठ्यावधीचा निधी खर्ची पडला आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था व आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली. जनजीवन विस्कळीत झाले, तर दुसरीकडे अनेकांना कोरोना संसर्ग होऊन गेला (हर्ड इम्युनिटी) आहे, हे कळलेही नाही किंवा त्याची नोंद कुठेही झालेले नाही. त्यांच्यावर शासनाचा एक रूपयाही खर्च झालेला नाही. मुंबईतील धारावी झोपडपट्टीच्या दाटीवाटी च्या परिसरात लोकांध्ये (हर्ड इम्युनिटी) तयार होऊन कोरोना संसर्गाला आळा बसला होता. पुणे, मुंबई, दिल्ली येथे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने सेरॉलॉजिकल सर्वेक्षण करून नागरिकांत कोरोना विरुद्धची प्रतिपिंडे तयार झाली असल्याचा निष्कर्ष समोर आला होता. कोल्हापुरातही याच पद्धतीने या सर्वेक्षणाची आखणी केली आहे. 

असे होणार सर्वेक्षण 

  • पहिल्या टप्प्यात 100 लोकांचे सर्वेक्षण 
  • कोल्हापूर शहरात पूर्वी कंटेनमेंट झोन असलेल्या 
  • नंतर खुला केलेल्या परिसराची यासाठी निवड 
  • शहरातील 500 व्यक्तींना निवडण्यात येणार 
  • इचलकरंजीतील 250 व्यक्तींची होणार निवड 
  • करवीर तालुक्‍यातील 250 लोकांची निवड होणार 
  • निवडलेल्या लोकांचे एक मिली रक्त घेतले जणार. 
  • रक्तातील प्रतिजैविके (आयजीजी अँन्टिबॉडीज) तपासणार 
  • व्यक्तीला कोरोना झाला की नाही हे तत्काळ कळणार 
  • कोल्हापूरातील संसर्गाचा वेग, पुढील दिशा ठरविण्या मदत होणार 

संपादन : विजय वेदपाठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: ट्रेन समोर… तरीही थांबले नाहीत! मुलुंड स्टेशनवर ट्रॅकवरच सुरू ‘फिल्मी’ मारामारी, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

एकता कपूर यांनी त्यांच्या कथांना महिला सशक्तीकरणाचे माध्यम असल्याचे सांगितले, मांडला आपला दृष्टिकोन

Australia Cricket Contract: ऑस्ट्रेलियाच्या करारात २१ खेळाडूंनाच स्थान; मॅक्सवेलसह नामांकित खेळाडूंना वगळलं; पाहा संपूर्ण यादी

Stock Market Today: ट्रम्पच्या भूमिकेमुळे शेअर बाजारात जोरदार उसळी! Indigo चे शेअर्स चर्चेत

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठ्या तपासाची शक्यता

SCROLL FOR NEXT