kolhapur education department teacher transfer process starts from wednesday Sakal
कोल्हापूर

Kolhapur News : शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर; शिक्षक बदली प्रक्रिया बुधवारपासून, जिल्ह्यातील ३६२५ इच्छुक

जिल्हा परिषद शाळेतील सुमारे ५६ टक्के शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज दाखल केले आहेत.

- राजेंद्र पाटील

फुलेवाडी : नवनियुक्त शिक्षकांना शाळेत पदस्थापना देण्यापूर्वी शिक्षकांच्या जिल्हांतर्गत विनंती बदल्या कराव्यात, असे शासनाचे आदेश आहेत. शनिवार (ता. १५) पासून शाळा सुरू झाल्या. मात्र, अद्याप शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. बदली प्रक्रिया पारदर्शक सुरळीतपणे व्हावी यासाठी शिक्षण विभाग जिल्हा व तालुका स्तरावर सुटी दिवशीही अखंडपणे काम करत आहे.

जिल्हा परिषद शाळेतील सुमारे ५६ टक्के शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज दाखल केले आहेत. विविध संवर्ग, त्यामधील प्राधान्यक्रम, विषयवार शिक्षक, अध्यापक अशा विविध गटांत बदल्या होणार असल्याने त्या याद्या बिनचूक व्हाव्यात यासाठी रात्री उशिरापर्यंत कर्मचारी बदली प्रक्रियेच्या कामात व्यस्त आहेत. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बुधवार (ता. १९) पासून प्रत्यक्ष बदली प्रक्रियेस सुरुवात होणार आहे.

दरवर्षी शिक्षकांच्या होणाऱ्या ऑनलाईन बदल्या थांबविण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे यावर्षीच बदलीची संधी असल्याने बदली इच्छुक शिक्षकांची संख्या वाढली आहे. सध्याच्या शाळेतील आपली सेवाज्येष्ठता संपावी यासाठी काही शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज दाखल केले आहेत.

तसेच शिक्षकांना सोयीच्या शाळेत जायची संधी मिळणार आहे. अनेक शाळांत रिक्त जागा असल्यामुळे बदली इच्छुक शिक्षकांची संख्या वाढली आहे. बदलीसाठी जे संवर्ग आहेत, त्या संवर्गानुसार व प्राधान्यक्रमानुसार शिक्षकांनी जोडलेली पुराव्याची कागदपत्रे तपासणे, त्यानुसार बिनचूक शिक्षक बदली याद्या तयार करणे यासाठी बराचसा वेळ लागत आहे. त्यामुळे तालुकास्तर व जिल्हास्तरावरील शिक्षण विभागातील कर्मचारी सुटीदिवशी ही दिवस रात्र राबवून या कामासाठी वेळ देत आहेत.

सीईओंचे सूक्ष्म नियोजन

शिक्षक बदल्या पारदर्शक व सोयीच्या व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी विशेष लक्ष दिले आहे. सध्या शिक्षक बदल्यांनाच त्यांनी प्राधान्य दिले आहे. त्यांनी मुख्याध्यापक बदल्या व मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबविली. त्यामुळे सर्व शिक्षक संघटनांनी त्यांच्या कामाचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

शिक्षक संघटना व बदली शिक्षकांच्या मागण्यांना न्याय देण्यासाठी सर्वांच्या सोयीच्या बदल्या पारदर्शकपणे व्हाव्यात यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस व शिक्षणाधिकारी मीना शेंडकर युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. ग्रामीण भागातील शाळा व शिक्षकांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

- प्रसाद पाटील, राज्याध्यक्ष, पुरोगामी शिक्षक संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT