kolhapur sakal
कोल्हापूर

Kolhapur : शेतकऱ्याची दैना ! काकडीला कमी दरामुळे शेतात फिरवली मेंढरे

पिकाच्या नुकसानीपोटी भेंडवडे येथील शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

सकाळ वृत्तसेवा

खोची - काकडी पिकाला अपेक्षित भाव न मिळाल्याने भेंडवडे येथील एका शेतकऱ्याने एक एकर काकडीच्या पिकात मेंढरे सोडली. व्यापाऱ्यांकडून दर कमी करून खरेदी मागणीमुळे शेतकऱ्यावर शेतात मेंढरं फिरवण्याची वेळ आली आहे.

भेंडवडे येथील शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रात काकडीचे पीक घेतले होते. सुरुवातीला काही दिवस पीक कमी असल्यामुळे स्वतः शेतकऱ्याने बाजारामध्ये काकडीची विक्री करून नफा मिळवला. परंतु काही दिवसांनी संपूर्ण क्षेत्रामध्ये काकडीचे उत्पादन जादा येऊ लागल्यामुळे तसेच विक्रीची म्हणावी तशी व्यवस्था होत,

नसल्यामुळे शेतकऱ्याने आपल्या शेतातील काकडीचे पीक व्यापाऱ्याला दिले. परंतु व्यापाऱ्यांनी अगदी अल्प दर देऊन काकडी विकत घेतली. त्यामुळे पुढील तोटा टाळण्यासाठी या शेतकऱ्याने आपल्या संपूर्ण एक एकर क्षेत्रामध्ये मेंढरे सोडून शेत रिकामे केले.

याबाबत या शेतकऱ्याकडून दिलेली माहिती अशी, सुरुवातीला काकडीचे उत्पादन सुरू झाल्यावर किलोला पन्नास ते साठ रुपये भाव मिळत होता. सुरवातीला स्वतः बाजारात जाऊन काकडीची विक्री केली. त्यानंतर हळूहळू उत्पादन वाढू लागल्यामुळे सर्व काकडी बाजारात नेऊ शकत नसल्यामुळे व्यापाऱ्यांना बोलवून काकडीची विक्री केली.

या व्यापाऱ्यांना बाजारात एक किलो काकडीला ५० ते ६० रुपये भाव मिळत असताना त्यांनी फक्त दहा ते पंधरा रुपये किलोने काकडी खरेदी केल्यामुळे तोटा झाला. घातलेला खर्च निघणार नाही हे निश्चित झाल्यामुळे भविष्यातील तोटा सहन करण्यापेक्षा पिकामध्ये नाईलाजाने मेंढरांना सोडण्याची वेळ आली.

योग्य विक्री व्यवस्था नसल्याचा फटका

शेतकऱ्यांकडून शेतामध्ये वेगवेगळे पीक घेण्याची तयारी आहे; परंतु हे पिकवलेले पीक बाजारात विक्री करण्यासाठी योग्य ती व्यवस्था नसल्यामुळे व्यापाऱ्यांच्या हवाली नाईलाजास्तव पिकविलेला माल द्यावा लागत आहे.

बाजारात जादा दर असतानाही व्यापाऱ्यांकडून जाणूनबुजून शेतकऱ्यांचा माल कमी भावात खरेदी करून घेतला जात आहे. योग्य ती विक्री व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Visa Policy: गोंधळ ओसरला, मात्र धाकधूक कायम! अमेरिकेच्या ‘एच-वन-बी व्हिसा’बाबत आयटीयन्सची परिस्थिती

IND vs WI 2nd Test Live: कर्णधारपदाची सवय झाली आहे! Shubman Gill चा विंडीजच्या खांद्यावरून ऑस्ट्रेलियावर निशाणा, म्हणाला...

Latest Marathi News Live Update : शरद पवार थोड्याच वेळात शिवालयकडे रवाना

Javed Akhtar : माझी मान शरमेने खाली गेलीये! तालिबानी मंत्र्यांच्या स्वागतावरून संतापले जावेद अख्तर, नेमकं काय म्हणाले?

बहीण-भावाच्या पवित्र नात्याला काळिमा! 13 वर्षीय मुलीवर भावाने केला अत्याचार, दोन मित्रांचाही सहभाग; निर्जनस्थळी नेलं अन्...

SCROLL FOR NEXT