कोल्हापूर : विजेसाठी शेतकरी वेठीस sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : विजेसाठी शेतकरी वेठीस

थकबाकी भरण्यासाठी महावितरणचा रेटा; पिके वाळू लागली

सागर चौगले

माजगाव : जुलैमधील अतिवृष्टी व महापुरामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हबकून गेला आहे. महापुरात वीज खांब कोसळून कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित झाला. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी उद्‌ध्वस्त झाला असतानाच कृषी पंपाचे वीज बिल भरण्यासाठी महावितरणने शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

दीड वर्षे कोरोना महामारीमुळे कृषी मालाला भाव नाही. जुलैमध्ये अतिवृष्टी व महापुरातील नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्यातून वाचलेल्या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. दुसरीकडे महापुरात नदीकाठचे वीज खांब व डीपी पडल्यामुळे कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. पाण्याअभावी पिके वाळू लागल्याने महावितरणने कोसळलेले वीज खांब उभे करून ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

पण शेतकऱ्यांनी कृषी पंपाचे थकीत वीज बिल भरल्याशिवाय वीजपुरवठा केला जाणार नाही, अशी महावितरणची वाटचाल दिसते. एकीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना वीज बिलासाठी महावितरणने लावलेल्या तगाद्यामुळे शेतकरी हबकून गेला आहे.

'शेतकऱ्यांनी कृषी पंपाचे बिल भरलेच पाहिजे, अशी सक्ती नाही; परंतु डिसेंबरअखेर थकीत वीज बिल भरले, तर त्यांचे ५० टक्के बिल माफ होणार आहे. शेतकऱ्यांना वीज बिल सवलतीचा फायदा व्हावा, तसेच बिल वसूल व्हावे, यासाठी प्रयत्न केला जात आहे.'

- सरदार चौगले, शाखा अधिकारी, पडळ उपवीज केंद्र.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमध्ये लाचखोरीप्रकरणी कृषी अधिकाऱ्यासह तिघांना अटक

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT