कोल्हापूर : केएमटीच्या आणखी पंधरा बस रस्त्यावर sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : केएमटीच्या आणखी पंधरा बस रस्त्यावर

तिकीट दरवाढीचा प्रस्ताव अद्याप प्राधिकरणाकडे नाही

डॅनियल काळे

कोल्हापूर : महापालिकेच्या केएमटी उपक्रमाकडील अनेक बसेस देखभाल आणि दुरुस्तीअभावी बंद असल्याच्या प्रकारावर ‘सकाळ’मधून प्रकाश टाकल्यानंतर बंद बसेसपैकी आणखी पंधरा बसेसची दुरुस्ती झाली असून, त्‍या रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या बसेसची संख्या ३१ वरून ४६ झाली आहे. टप्‍प्याटप्‍प्याने का होईना आता केएमटीत सुधारणा होत आहे. यामुळे बुडत्याला काडीचा आधार या म्हणीप्रमाणे केएमटीला आधार मिळाला आहे.

आर्थिक संकटातील केएमटीला लॉकडाउनमध्ये मोठ्या संकटाचा सामना करावा लागला तरी लॉकडाउन संपल्यानंतर आता झालेले नुकसान भरून काढण्याची वेळ आली आहे. असे असताना अनेक बसेस बंद पडणे आणि त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नसणे हेच एक प्रमुख कारण बसेस बंद पाडणे मागचे असल्याचे बोलले जात आहे. सध्या केवळ तीस ते बत्तीस बसेस धावत होत्या. प्रवासी मुबलक असले तरी बसचे वेळापत्रक कोलमडले आहे. फायद्याच्या मार्गावर दर अर्ध्या तासाने बस सेवा अपेक्षित आहे. पण, तिथे एक ते दीड तासाच्या अंतराने बस जात आहे.

सध्या बाजारात डिझेल ९४ रुपये आहे. एका बसला दररोज किमान ६० लिटर डिझेल लागते. पण, सध्या केएमटीचे तिकीट दर पहिला टप्पा दहा रुपये इतका आहे. त्यानंतर पुढच्या प्रत्येकी दोन किलोमीटर अंतराला दोन रुपये अशा पद्धतीने तिकीट आकारणी होते. सप्टेंबर २०१८ मध्ये दरवाढीची रचना झाली. त्याप्रमाणेच अजूनही तिकीट आकारणी सुरू आहे. त्यावेळी डिझेलचा भाव ७६ रुपये होता. आता भाव ९४ रुपये असतानाही त्याच दराने तिकीट आकारणी सुरू आहे. केएमटीचे तिकिटाचे दर निश्चित करण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रादेशिक प्राधिकरणाची मंजुरी लागते. सर्व वस्तुस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर प्राधिकरण तिकीट दरवाढीला मंजुरी देते. पण, केएमटी प्रशासन आणि मनपाकडून असा कोणताही प्रस्ताव अद्याप तयार केला नसल्याने जुन्याच तिकीट दराची अंमलबजावणी सुरू ठेवून आतबट्ट्यातला व्यवहार केला जात आहे.

हे तातडीने करणे आवश्‍यक

  • आणखी बसेसची दुरुस्ती आवश्‍यक

  • तिकीट दराबाबत तातडीने प्रस्ताव द्यावा

  • फायद्याच्या मार्गावर जादा बसेसची गरज

  • वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेण्याची आवश्‍यकता

  • प्रशासकांच्‍या कारवाईच्‍या भूमिकेनंतर दुरुस्ती

नादुरुस्त बसेसच्या दुरुस्तीसाठी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी निधीची तरतूद केली असूनही त्याकडे लक्ष दिले नसल्याने बसेस दुरुस्त व्हायला वेळ लागला होता. याबाबतत प्रशासकांनी कारवाईची भूमिका घेतल्यानंतर बसेस दुरुस्ती होऊन रस्त्यावर धावत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT