kolhapur finance scam fraud investment high return 15 thousand cr fraud cyber schemes police esakal
कोल्हापूर

Kolhapur Finance Scam : ...तर व्याज सोडाच, मुद्दलही मिळणार नाही!

गुंतवणूक करताना सजगता आवश्‍यक; जिल्‍ह्यात दहा कंपन्यांतील दीडशे जणांकडून गंडा

- लुमाकांत नलवडे

Kolhapur News: कोणीही यावे गुंतवणूकदारांना फसवून जावे, अशी स्थिती कोल्हापुरात झाली आहे. जिल्ह्यात केवळ दीडशेजणांनी पाच वर्षांत तब्बल पंधरा हजार कोटींची फसवणूक केल्याचे पोलिसांकडील माहितीवरून पुढे आले आहे.

त्यामुळे गुंतवणूक करताना जादा परताव्याचे गाजर दाखवले तरीही बळी पडणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. अन्यथा व्याज, जादा परतावा सोडाच, मुद्दलसुद्धा हाती मिळणार नाही, अशी स्थिती आहे.

कोल्हापुरात यापूर्वी पाण्याची गादी म्हणून एक मोठे फसवणुकीचे प्रकरण गाजले होते. भुदरगड, मानिनी अशा अनेक संस्थांत अधिक व्याजाच्या हव्यासापोटी ठेवी ठेवल्या आणि त्यातूनही मोठी फसवणूक झाली.

जिल्ह्यातील अशा अनेक फसवणुकीचे फंडे राज्यभर गाजले. त्यानंतर किमान आर्थिक फसवणूक होणार नाही, याची काळजी घेतली जात होती; मात्र कोरोनानंतर पुन्हा एकदा आर्थिक फसवणुकीचे प्रमाण वाढले. गेल्या पाच वर्षांत एक -एक आर्थिक व्यवहाराचे घोटाळे पुढे येत असतानाही दामदुप्पट, सहल आणि वेगवेगळ्या आमिषाला अनेकजण बळी पडले. ईझी मनीच्या हव्यासात अनेक तरुण, युवक, वृद्ध हातात होते ते ही गमावून बसले. काहींनी कर्ज घेऊन गुंतवणूक केली आणि पश्‍चातापाशिवाय पर्याय राहिला नाही.

‘लोभ’ आणि ‘गरज’ ओळखता आली पाहिजे. शेअर ट्रेडिंग, जादा व्याजदर, दामदुप्पट, एजंटांना मोटार भेट, परदेशी सहली असे गाजर दाखविल्यामुळे अनेक गुंतवणूकदार बळी पडले आहेत. आर्थिक हव्यासामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात गुंतवणूकदारांची फसवणूक होत आहे.

- महेंद्र पंडित, पोलिस अधीक्षक

अधिकारीच चौकशीच्या फेऱ्यात

ए. एस. ट्रेडर्समधील म्होरक्या लोहितसिंग सुभेदारला अटक झाली, मात्र पुढे तपास अधिकारीच चौकशीच्या फेऱ्यात अडकला. अशावेळी गुतंवणूकदारांनी पैसे परत मिळतील याची काय गॅरंटी? याबाबत विचार करावा.

वसुलीचे आकडे अत्यल्प

जिल्ह्यात कोण-कोणत्या कंपन्यांनी फसवणूक केली, याची यादीच चक्क सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दीडशेजणांनी पाच वर्षांत पंधरा हजार कोटींची फसवणूक केली आहे. त्यापैकी अटक आणि वसुली हे आकडे अत्यल्प आहेत. त्यामुळे है पैसे बुडले, अशीच काहींची मानसिक स्थिती झाली आहे. वस्तुस्थितीही अशीच आहे.

अशी घ्या काळजी

- गुंतवणूक करताना जादा परताव्याचा हव्यास सोडा

- दामदुप्पट, सहल अशा आमिषाला बळी पडू नका

- ‘ईझी मनी’चा हव्यास टाळा

पाच वर्षांतील आर्थिक फसवणूक करणाऱ्यांची संख्या

  • शाहूपुरी पोलिस ठाणे - ११४

  • राजारामपुरी - ५

  • हातकणंगले- ४

  • गांधीनगर -६

  • इचलकरंजी -७

  • मुरगूड -५

  • शिवाजीनगर - १३

  • आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे २२ गुन्ह्यांचा तपास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT