Kolhapur-Flood 
कोल्हापूर

पूर ओसरला! नुकसानभरपाई मिळणार किती आणि कधी? पूरग्रस्तांचा सवाल

पूरग्रस्तांचा सवाल; भिजलेले संसार सावरण्यासाठी सुरू आहे पराकाष्ठा

नंदिनी नरेवाडी - पाटोळे

कोल्हापूर: महापूर ( Kolhapur Flood) आला, घरात पाणी घुसले आणि ते आठ-दहा दिवस शाळेच्या निवारा केंद्रात काढावे लागले. पूर ओसरला आणि चिखलाने बरबटलेले घर, भिजलेला संसार पुन्हा धुवून पुसून ठेवण्यात दिवस जातो, पुरात झालेल्या नुकसानीची भरपाई शासन देणार आहे. मात्र, ही मदत कधी मिळणार, किती मिळणार, याची माहिती आमच्यापर्यंत नाही. ही भरपाई आम्हाला मिळेल की नाही, याचीच चिंता आहे, अशी भावना शहरातील पूरग्रस्तांनी व्यक्त केली.

मुळात कोरोनाने हिरावलेला रोजगार, महापुरात झालेले नुकसान आणि भविष्यात होणाऱ्या खर्चाची तजवीज याचा विचार करताना पूर ओसरला; पण डोळ्यांची झोपच उडाली आहे. महापूर काळात शहरातील उपनगरीय भागात पुराचे पाणी घुसले. गल्लीगल्लीतील सर्वसामान्य, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या तोंडाचा घासच महापुराने हिरावला. ही कुटुंबे निवारा केंद्रात होती. त्यांच्या व्यथा ‘सकाळ’च्या माध्यमातून मांडल्या. यात जाधववाडी शाळा, बापट कॅम्प सोसायटी, शाहू सांस्कृतिक मंदिर, वालावलकर हायस्कूल, महसूल भवनमध्ये तात्पुरते स्थलांतर केले. पूर ओसरताच ते आपापल्या घरी गेले. अशात गेल्या आठवड्यात महसूल प्रशासनाचे अधिकारी पाहणी करण्यासाठी आले.

घरात पूर आल्याचा पुरावा म्हणून छायाचित्र काढले. पासबुक, आधारकार्ड व रेशनकार्ड यांच्या झेरॉक्स घेऊन निघून गेले. आता सगळ्या गल्लीत चर्चा आहे अकाउंटवर पैसे जमा होणार, अशा सर्व गप्पा आधीच चिंतीत, व्याकुळ मनाला आणखी चिंतीत करीत आहेत.पुन्हा सावरत उमेदीने संसार उभारले२०१९ मध्ये महापूर आला आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून औषधांसह घरगुती साहित्याच्या गाड्या गल्लोगल्ली आल्या. स्वयंसेवी संस्था-व्यक्ती, राजकीय पक्ष, तरुण मंडळे या घटकांकडून मदतीचा ओघ होता. वर्षभरात कोरोनाने समाजाचे अर्थकारण बिघडले. आणि इच्छा असूनही अनेकांना मदतीचा हात आखडता घ्यावा लागला. काहींना स्वयंसेवी संस्थांकडून मदत मिळाली. मात्र, काहींपर्यंत तरी मदत मिळालेली नाही. त्यांची मदत मिळो अथवा न मिळो मात्र पुरातून सावरून नव्या उमेदीने लढत असल्याचे या पूरग्रस्तांनी सांगितले.

२०१९ च्या महापुरात बरेच नुकसान झाले होते. ते भरून काढताना कोरोनामुळे २०२० वाया गेले. आता तर महापूर आणि कोरोना दोन्ही संकटे एकत्र असताना कसेबसे पुराच्या काळातील सात-आठ दिवस काढले. ‘सकाळ’मध्ये बातमी आल्यावर मदतीचा ओघ सुरू झाला. मिळालेल्या मदतीमुळेच पुन्हा उभारी मिळाली आहे.

-उषा साठे, पूरग्रस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

खोटं बोलून नदी किनारी नेलं; नंतर जावयानं सासूला क्रूरपणे संपवलं, संतापजनक कारण समोर

Velhe Nasrapur Protest: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा राजगड तालुक्यात तीव्र पडसाद; वेल्हे-पानशेतसह परिसर कडकडीत बंद

SCROLL FOR NEXT