Kolhapur Flood esakal
कोल्हापूर

Kolhapur Flood : नृसिंहवाडीसह अनेक प्रमुख मार्ग अद्यापही पाण्याखालीच; दत्त मंदिराची काय स्थिती? कधी सुरु होणार मार्ग?

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज कुरुंदवाड येथील पूरग्रस्तांना स्थलांतरित केलेल्या निवारा केंद्राला भेट दिली.

सकाळ डिजिटल टीम

पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत इंचाने वाढ झाली असून, पाणीपातळी स्थिरावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पूरस्थिती कायमच आहे.

कुरुंदवाड : धरणातील विसर्ग व पाणलोटक्षेत्रातील पावसाचा जोर (Kolhapur Flood) कमी झाल्यानंतरही कुरुंदवाड व परिसरातील पूरपरिस्थिती जैसे थे असल्याचे चित्र असून, पावसाने उघडीप दिल्याने पूरग्रस्त भागांना थोडासा दिलासा मिळाला आहे. कुरुंदवाड, नृसिंहवाडीसह अनेक प्रमुख मार्ग अद्यापही पाण्याखालीच आहेत. त्यामुळे दळणवळण यंत्रणा ठप्प असून, रस्ते कधी मोकळे होतील, याकडे पूरग्रस्तांचे डोळे लागले आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज कुरुंदवाड येथील पूरग्रस्तांना स्थलांतरित केलेल्या निवारा केंद्राला भेट दिली. जिल्हाधिकारी येडगे यांनी गोठणपूर परिसर, शिवतीर्थ परिसर, शिकलगार वसाहत परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी करून पाणीपातळी वाढू लागल्यास नागरिकांना सुरक्षितस्थळी वेळेत स्थलांतर करण्याच्या सूचनाही पालिका प्रशासनाला दिल्या. महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासन कमी पडणार नाही, असेही सांगितले.

पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत इंचाने वाढ झाली असून, पाणीपातळी स्थिरावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पूरस्थिती कायमच आहे. दुपारपासून दिनकरराव यादव पुलावरून पाणी वाहत आहे. बस्तवाड रस्ता पूर्ण बंद झाला आहे. तर हेरवाड-तेरवाड रस्त्यावर ही पाणी आले आहे. जिल्हाधिकारी येडगे यांनी कुरुंदवाड येथील दत्त महाविद्यालय, एस. के. पाटील महाविद्यालय, एस. पी. हायस्कूल येथे सुरू करण्यात आलेल्या निवारा केंद्रांना भेट दिली. पूरग्रस्तांशी संवाद साधला. त्यांना सुविधा मिळत आहेत किंवा नाहीत, अडचणी येत आहेत का, याबाबतही विचारपूस केली.

गोठणपूर, मोमीन गल्ली, शिकलगार वसाहत, मजरेवाडी रस्ता, बस्तवाड रस्ता या महापुराच्या सीमेच्या ठिकाणी भेट देऊन पूरस्थितीवर रेस्क्यू फोर्स व पालिका प्रशासन कशा पद्धतीने नियंत्रण ठेवत आहे, याची पाहणी केली. अचानक पाणीपातळी वाढल्यास नागरिकांना तत्काळ स्थलांतर करण्याची यंत्रणा सज्ज ठेवा, त्याचबरोबर कुरुंदवाड शहराला विळखा पडल्यास हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी हेलिपॅड यंत्रणाही सज्ज ठेवा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रांताधिकारी मोसमी चौगुले, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, गट विकास अधिकारी नारायण घोलप, सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक सागर पवार, वजीर रेस्क्यू फोर्सचे रौफ पटेल, प्रकाश आलासे, नीलेश तवंदकर, कृष्णात भेंडे, आदी उपस्थित होते.

इचलकरंजीत पूर ओसरण्यास सुरुवात

इचलकरंजी : इचलकरंजीत पंचगंगा नदीला आलेला पूर आजपासून ओसरण्यास सुरुवात झाली. आज सांयकाळपर्यंत एक इंच पातळी घटली. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पुढील एक-दोन दिवसांत पूर पूर्णतः ओसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पूरबाधित क्षेत्रातील स्वच्छतेचे नियोजन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. पूर ओसरत गेल्यानंतर संबंधित भागांत औषध फवारणीसह युध्दपातळीवर स्वच्छता केली जाणार आहे.

गेल्या आठ दिवसांपासून सतत पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढत होती. आज मात्र सकाळच्या सत्रात पातळी स्थिर राहिली. तर सायंकाळनंतर एक इंच पूर कमी झाला. त्यामुळे आज पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर थांबले. आता निवारा केंद्रात असणाऱ्या पूरग्रस्त नागरिकांना पूर ओसरण्याची आस लागली आहे. दरम्यान, पूर ओसरल्यानंतर रोगराईची भीती आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आतापासूनच स्वच्छतेची तयारी सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT