kolhapur rain
कोल्हापूर

कोल्हापूर : रात्र झाली की काळजाचा ठोका चुकतो

आता महापूर नित्याचाच झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : आता महापूर नित्याचाच झाला आहे. पावसाळा आला की, पहिल्यांदा मनाची तयारी करतो. पाणी वाढले की, प्रापंचिक साहित्याची बांधाबांध करायची आणि घराजवळ पाणी आले की, लगेच चित्रदुर्ग मठात स्थलांतरित व्हायचे. हे आता ठरलेलेच आहे; पण आजही पावसाळ्यात रात्र झाली की, काळजाचा ठोका चुकतो. ही भावना सुतारमळा येथील नागरिक बोलून दाखवतात. सध्या त्यांनी युद्धपातळीवर प्रापंचिक साहित्याची बांधाबांध करायला सुरुवात केली आहे. एकूणच नदीकाठी असणाऱ्या सर्वच वसाहतींमध्ये घबराटीचे वातावरण असून, पाणी वाढल्यास त्यांनी स्थलांतर करण्याची तयारी ठेवली आहे.

शहरातील सुतारमळा, सीता कॉलनी, शाहूपुरी, मुक्त सैनिक वसाहत, कसबा बावडा, कदमवाडी, जाधववाडी, पाटोळेवाडी, बापट कॅम्प या भागांत महापुराचे पाणी येते. काही ठिकाणी नदीचे, तर काही भागांत स्थानिक ओढ्यांचे पाणी शिरते. त्यामुळे येथील नागरिकांनी आताच प्रापंचिक साहित्याची बांधाबांध करण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाचे अधिकारी रोज सकाळी आणि सायंकाळी येऊन पाहणी करतात. पाणी कुठपर्यंत आले की, घर सोडायचे याचे त्यांचे ठोकताळे ठरलेले आहेत. त्यामुळे या सर्व भागांतील नागरिक स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत. यातील बहुतांशी नागरिकांची व्यवस्था मुस्लिम बोर्डिंग, चित्रदुर्ग मठ, शाहू सांस्कृतिक भवन, मुक्त सैनिक वसाहतीमधील दोन शाळा येथे केली आहे.

दरम्यान, शहरामध्ये पावसाची उघडझाप सुरू होती. सकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. दुपारी पावसाने दमदार फलंदाजी केली. सायंकाळी ५ नंतर पावसाने काही काळ विश्रांती घेतली; मात्र धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने नदीची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. शुक्रवार पेठेतील नदी घाटाच्या रस्त्यालगत पाणी आले आहे, तर अंत्यविधी करण्यात येणाऱ्या घाटावरही पाणी आले आहे. सुतारमळ्याच्या मागील बाजूस पाणी आले आहे. या सर्व भागांत प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, सूचना मिळाल्यानंतर तत्काळ स्थलांतर करावे, असेही सांगितले आहे.

महापुराची भीती प्रत्येक पावसाळ्यात असते. त्यामुळे आम्ही तयारीत राहतो. गेल्या दोन दिवसांपासून सर्व प्रापंचिक साहित्य सुरक्षित ठेवले आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, पाण्याची पातळी वाढली की, तातडीने आम्ही स्थलांतरित होणार आहोत.

- अमित लोहार, नागरिक, सुतारमळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT