crime
crime  sakal
कोल्हापूर

धक्कादायक! जमिनीच्या वादातून दाताने ओठ तोडला

धनश्री ओतारी

घर व शेताच्या वादातून परशराम कतीगार यांचा ओठ एकाने दाताने तोडल्याची घटना तेरणी (ता. गडहिंग्लज) येथे घडली. याप्रकरणी गावातीलच करवीर कतीगार व सिद्धव्वा कतीगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. चार दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेची नोंद आज पोलिसांत झाली आहे.

पोलिसांनी सांगितले की, परशराम व करवीर हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. त्यांच्यात पूर्वीपासून शेत व घराच्या जागेच्या कारणावरून वाद आहे. २२ एप्रिलला दुपारी दोनच्या सुमारास परशरामच्या घरी मागे लावलेल्या पत्र्यावर करवीरने लाथा मारत शिवीगाळ करू लागला.

भिंत बांधायला सांगितली होती, असे म्हणत करवीर व त्याची पत्नी सिद्धव्वा दोघेही परशरामची गळपटी धरून मारहाण करू लागले. त्यांना समजावून सांगत असतानाही त्याला मारहाण केली. तेव्हा परशरामची पत्नी रेणुका ही आडवे गेल्याने तिलाही ढकलून दिले.

सिद्धव्वाने परशरामला मारहाण करून दगडाने त्याच्या पाठीत व खांद्यावर मारहाण केली. करवीरने परशरामच्या खालील ओठाचा जोराने चावा घेऊन तोडून बाजूला काढले. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. ओठाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. रेणुका हिने पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT