Kolhapur Gaganbawda road closed  traffic due to floods at Longhe
Kolhapur Gaganbawda road closed traffic due to floods at Longhe 
कोल्हापूर

जोतिबा- केर्ली रस्ता पुन्हा खचला ; मार्ग वाहतूकीस बंद , गतवर्षीच्या पुराची आठवण...

संभाजी गंडमाळे

कोल्हापूर : गेल्या महापुरानंतर आता नुकत्याच सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा जोतिबा- केर्ली रस्ता खचला आहे. हा मार्ग वाहतूकीस बंद करण्यात आला आहे.

कोल्हापूर- गगनबावडा रस्त्यावर लोंघे येथेही पाणी आल्याने रस्ता वाहतूकीस बंद करण्यात आला आहे. दरम्यान, पावसाचे पाणी आता शहरात शिरण्यास सुरवात झाली असून मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील परिख पुलाखाली पाणी आल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाला आहे.

शाहूपुरी बागल चौकातील कब्रस्तानात दोन फूट पाणी आल्याने मुस्लीम धर्मीयांना दफनविधी करता येणार नाहीत. त्यासाठी पर्याय म्हणून कसबा बावडा- लाईन बाजार येथील कब्रस्तानात दफनविधी केले जाणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण 86 बंधारे पाण्याखाली गेले असून राजाराम बंधारा पातळी 34 फूट सहा इंच इतकी आहे.  

पन्हाळ्यात संततधार
 पन्हाळा तालुक्‍यात आज दिवसभर जोरदार वाऱ्यासह संततधार राहिली. आज सकाळी आठपर्यंत सरासरी ४९ मिमी. पाऊस पडला असून आजअखेर सरासरी ६६४ मिमी. पाऊस नोंदला गेला. पन्हाळ्यात आज ४७ मिमी. तर आजअखेर ११२५ मिमी. पाऊस झाला आहे. सर्वात कमी पाऊस ३८९ मिमी. कोडोली सर्कलमध्ये नोंद झाला आहे.

आजऱ्यात पावसाची धुवाँधार
तालुक्‍यात धुवाँधार पाऊस कोसळत आहे. हिरण्यकेशी व चित्रा नदीला पाणी आले असून साळगाव व किटवडे हे दोन बंधारे पाण्याखाली आहेत. ठिकठिकाणी वृक्ष कोसळले आहेत. किणे-नेसरी मार्गावर वृक्ष कोसळल्यामुळे सुमारे तीन तास वाहतूक ठप्प होती.काल रात्रभर तालुक्‍यात अतिवृष्टी झाली. सरासरी ६३ मिमी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे पावसाने हजार मिमी.चा टप्पा ओलांडला आहे. साळगाव व किटवडे बंधारे पाण्याखाली आहे. साळगावकडील वाहतूक सोहाळे मार्ग वळवली आहे.

जयसिंगपुरात तुरळक 

 पावसाने सोमवारी रात्रीपासून हजेरी लावली. ऊस, सोयाबीन, उडीद, भात पिकासाठी हा पाऊस उपयुक्त मानला जात असला तरी वेळेत पडला नसल्याने दुबार पेरणीच्या संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे. पाऊस नसल्याने ऊस लावणीवरही संभ्रम होता. 

इचलकरंजीत तारांबळ
इचलकरंजी अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आज शहर व परिसरात श्रावणी सरीने जोरदार हजेरी लावले. कधी मुसळधार तर कधी रिमझिम 


संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT