narendra modi sakal
कोल्हापूर

Kolhapur : ‘जेनेरिक’चे मोदींच्या हस्ते होणार उद्‌घाटन, पन्हाळा तालुक्यातील पोखले गावाला मिळाला मान

१५ ला ऑनलाईन समारंभ पन्हाळा तालुक्यातील पोखले गावाला मिळाला मान

सकाळ वृत्तसेवा

पन्हाळा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट २०२३ पासून ग्रामीण भागातील विविध विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक गावात जेनेरिक औषध मेडिकल दुकान योजना चालू केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील पहिले दुकान सुरु करण्याचा मान पन्हाळा तालुक्यातील पोखले येथील बलभीम विकास सेवा संस्थेला मिळाला आहे. या दुकानाचे १५ आॅक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्‌घाटन होणार आहे.

सामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात औषध मिळावीत म्हणून पंतप्रधानांनी ग्रामीण भागातील प्रत्येक गावात जेनेरिक औषध दुकान योजना राबविली आहे. या योजनेअंतर्गत सुरु होणाऱ्या पहिल्या दुकानाबाबत पन्हाळा सहायक निबंधक नारायण परजणे यांनी माहिती दिली.

त्या अनुषंगाने फार्मासिटिकल ब्युरो ऑफ इंडियाचे सहायक व्यवस्थापक अनुज तिवारी, कोल्हापूर विभागीय सहनिबंधक अरुण काकडे,पन्हाळा सहायक निबंधक नारायण परजणे, व्ही. एस.मठ्ठीमनी, एम. एम. पाटील, एच. डी. खोत यांनी संस्थेला भेट देऊन दुकानासाठी लागणारी जागा, कर्मचारी, फर्निचर व यंत्र सामग्रीची पाहणी केली.

औषधांच्या खर्चात होणार बचत या योजनेमुळे ग्रामीण भागातील जनतेला गुणवत्तापूर्ण औषधे परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध होणार असल्यामुळे सामान्य नागरिकांच्या औषध खर्चात बचत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT