गोकुळ
गोकुळ sakla
कोल्हापूर

कोल्हापूर : गोकुळ हा जिल्ह्याचा आत्मा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘गोकुळ’ हा कोल्हापूर जिल्ह्याचा आत्मा आहे. दूध उत्पादकांना इतर ठिकाणी दूध घालण्यापेक्षा गोकुळकडे संकलित करावे, म्हैस दूध वाढ करण्यासाठी जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत पाचशे कोटींचे काय, पण एक हजार कोटीचे कर्ज द्यावे लागेल तरी दिले जातील, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी ‘गोकुळ श्री’ पुरस्कार तसेच जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या दूध संस्था, गाय-म्हैस, उत्तम प्रतीचे दूध पुरवठा करणाऱ्या संस्था, गुणवंत कामगार व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सत्कार पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते केला.

श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘प्रतिदिन वीस लाख लिटर दूध संकलन करण्याचे उद्दिष्ट आहे. म्हैस दूध उत्पादन वाढावे यासाठी जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज दिले जात आहे. सध्या ५०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट्ये १००० कोटींपर्यंत केले जाईल. मात्र, गोकुळ शिवाय इतर संघांना दूध देणाऱ्या उत्पादकांनी गोकुळला दूध पुरवठा करावा.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ‘‘पश्‍चिम महाराष्ट्रात गोकुळ हा एकच ब्रॅंड केला जाईल. यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान, दूध उत्पादक शेतकरी, कर्मचारी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी गोकुळचे आपण स्वत:च विश्‍वस्थ असल्याप्रमाणे काम केले पाहिजे.’’

दूध उत्पादकांचा सत्कार

म्हशीचे दूधपुरवठा करणाऱ्या सभासद पूजा घुगरे, लक्ष्मी (लिंगनूर), विजय दळवी, कामधेनू (लिंगनूर), मानसी चौगले, जयभवानी (आमजाई व्हरवडे, ता. राधानगरी), गाय दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये शांतराम साठे (कै. किसनराव मोरे, सरवडे), हुबगोंडा पाटील (चिपरी) लक्ष्मी संस्था.

दूध संस्थांचा सत्कार

जनसेवा (पाडळी खुर्द), हनुमान (वडकशिवाले), उदय (पोर्ले तर्फ ठाणे) व राम (चुये,). सिध्दु आग्नु पाटील (अर्जुनवाड), यशवंत (येवती), अमृतेश्‍वर (निंगुडगे), लक्ष्मी(खणदाळ), शिवपार्वती (कसबा नूल). महालक्ष्मी महिला (चुये), जिजामाता महिला (घुणकी), धनलक्ष्मी महिला (व्हनाळी), भावेश्‍वरी (सरोळी), अमृतेश्‍वर (निंगुडगे), रवळनाथ (मलीग्रे). लक्ष्मी (खणदाळ), शिवपार्वती (क.नूल), लक्ष्मी (गडहिंग्लज). रवनाथ (तुर्केवाडी), भैरवनाथ (निट्टर), बलभिम (तडशिनहाळ). जोतिर्लिंग (मडलिगे खुर्द), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (वाघापूर), राम (मडिलगे बुद्रुक), शेतकरी (चिखली), भैरवनाथ (साके), कामधेनु (सुळकूड), लालबहादुर शास्त्री (चांदेकरवाडी), दत्त (कपिलेश्‍वर), गजराज (क.वाळवे), हनुमान (पुनाळ), यशवंत (पुनाळ), सुवर्णा (माजनाळ). विठ्ठलाई (साखरी), हनुमान (तिसंगी), हनुमान (लोघें), दत्त (सांगरूळ), हनुमान (केर्ली), मा. धो. खाडे हरहर महादेव (सांगरूळ), जिजामाता (घुणकी),

कृष्ण (रांगोळी), महादेव (गोगवे), संजय (व्हरकटवाडी), सौ अनुराधा बा. पाटील महिला (वाडीचरण), अंबिका महिला (नांदणे), कै. सिध्दु पाटील (अर्जुनवाड), लक्ष्मी (चिपरी), दत्तात्रय पाटील-धामणेकर (धामणे), लकमेश्‍वर (गजरगाव), राजहंस (लाकुडवाडी), चाळोबा (वैरागवाडी), भावेश्‍वरी (हिडदुगी), महालक्ष्मी (नवकुड), कमलेश्‍वर (किणे), दत्तात्रय (राजगोळी बु.), भैरवनाथ (निट्टर), महालक्ष्मी (सोनगे), दत्त (बेलवळे बु.) श्रीपतराव घाटगे (वंदुर), मोताई (वारनुळ), दत्त छाया (पणोरे), पांडुरंग (पोहाळे तर्फ बोरगाव), हनुमान (लोघें), हुनमान (तिसंगी), पांडुरंग (असंडोली), केदारलिंग (कावणे), दूधगंगा (निगवे खा.), गणेश (इस्पुर्ली), किसान कामगार (रुई), गोकुळ (इंगळी), सद्‌गुरू (नादवडे), शेतकरी (वाघापूर), सिध्देश्‍वर (भाटिवडे), दत्त (नरतवडे), गजराज (क. वाळवा), जोतिर्लिंग (चंद्रे), जोतिर्लिंग (निळे-भोसलेवाडी), भैरवनाथ (सांबू), गोरक्षनाथ (पेरीड), साताळ देवी (आकुर्ळे), दत्त (हरोली), दत्त (शिरढोण), दत्त (टाकळी). महिला दूध संस्थांची नावे भावेश्‍वरी (गजरगाव), अंबाबाई (आकुर्डे), अहिल्यादेवी (राजगोळी खुर्द), अक्कमहादेवी (तेरणी), महालक्ष्मी (लोंघे), भाग्यलक्ष्मी (कुंभोज), धनलक्ष्मी (व्हनाळी), महालक्ष्मी (हणमंतवाडी), प्रतिभाताई पवार (पोर्ले तर्फ ठाणे) यशोदा अवधूत जोशी (चांदेकरवाडी), अनुराधा पाटील ( वाडीचरण) व इंदूबाई जाधव-घुणकीकर (जयसिंगपूर).

पुरस्कार रक्कम :

गोकुळ श्री : ९० हजार रुपये

जिल्हा दूध संस्था : २ लाख ४० हजार रुपये

तालुका स्तर : ६ लाख ५० हजार रुपये

गुणवंत कामगार : ३० हजार रुपये

मार्केटिंग : १ लाख ५० हजार रुपये

खेळाडू व पैलवान : २ लाख ४० हजार रुपये

एकूण : १४ लाख रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT