kolhapur gram panchayat sarpanch election 2021 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील सरपंच निवडीला स्थगित  

निवास चाैगले

कोल्हापूर - सरपंच पदाची आरक्षण सोडत काढताना रोटेशन पध्दतीचा अवलंब न केल्याची तक्रार थेट उच्च न्यायालयात झाल्यानंतर न्यायालयाने जिल्ह्यातील सहा गावांतील सरपंच निवडीला स्थगिती दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर ही सहा गांवे असलेल्या करवीर, शिरोळ, पन्हाळा व भुदरगड तालुक्‍यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीला 16 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढले. 

दरम्यान, या चार तालुक्‍या व्यतिरिक्त शाहुवाडी, राधानगरी, हातकणंगले, कागल, गगनबावडा, आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्‍यातील नुकत्याच निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी ठरल्याप्रमाणे 9 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. 

जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. या ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या पहिल्या सभेत सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रमही जाहीर झाला होता. त्यानुसार 9 फेब्रुवारी रोजी या निवडी होणार आहेत. तथापि पन्हाळा तालुक्‍यातील उंड्री, करवीर तालुक्‍यातील कोगे व खुपीरे, शिरोळ तालुक्‍यातील मजरेवाडी व शिरटी तर भुदरगड तालुक्‍यातील फणसवाडी या सहा गावातील सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील निर्णय देताना उच्च न्यायालयाने यासंदर्भातील सुनावणी 9 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांनी घेण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर 8 ते 11 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीला 16 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. 

सरपंच पदाचे आरक्षण महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 30(5) व मुंबई ग्रामपंचायत निवडणूक अधिनियम 1964 मधील तरतुदीनुसार तालुकानिहाय काढण्यात आले असल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिरोळ, करवीर, पन्हाळा व भुदरगड तालुक्‍यातील 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सरपंच, उपसरपंच निवडीला 16 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देत असल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी यासंदर्भात काढलेल्या आदेशात म्हटले आहे. या व्यतिरिक्त उर्वरित आठ तालुक्‍यातील सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी 9 फेब्रुवारी रोजी घेऊन त्याचा अहवाल 10 फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावा असेही या आदेशात म्हटले आहे. 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT