Tree Collapse sakal
कोल्हापूर

Kolhapur Rain Update: मध्यरात्रीच्या मुसळधार पावसातही वाहतूक झाली सुरळीत, वाहनचालकांनी केले राधानगरी पोलीसांचे कौतुक

मध्यरात्री साधारण 1.30 ची वेळ.. देवगड-निपाणी-कलादगी या राज्य मार्गावर फोंडाघाटात झाड पडल्यामुळे वाहतूक कोंडी होवू लागली.... दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या..

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - मध्यरात्री साधारण 1.30 ची वेळ.. देवगड-निपाणी-कलादगी या राज्य मार्गावर फोंडाघाटात झाड पडल्यामुळे वाहतूक कोंडी होवू लागली.... दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या.. अशावेळी या मार्गावरील वाहन चालकाने नियंत्रण कक्षाच्या १०० आणि १०१ क्रमांकावर संपर्क केल्यावर लगेचच उपअभियंता एस. बी. इंगवले, शाखा अभियंता एस. के. किल्लेदार, पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्यासह पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी याठिकाणी पोहोचले.

मुसळधार पावसातही प्रशासकीय यंत्रणेने कार्यतत्परता दाखवत पहाटे 3 वाजेपर्यंत रस्त्यावर पडलेले झाड हटवले आणि घाट मार्गातील वाहतूक सुरळीत सुरु झाली..

इतक्या मोठ्या मुसळधार पावसातही अल्पावधीतच घाटरस्ता मोकळा झाल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. या मार्गावरुन जाणाऱ्या आणि इथल्या वाहतूक कोंडीतून जलदगतीने बाहेर पडलेल्या एका ट्रॅव्हल्सच्या वाहनचालकानेही या कृतीची दखल घेत "धन्यवाद राधानगरी पोलीस, PWD department राधानगरी" असा संदेशही पाठवला..

अतिवृष्टी आणि पूरसदृश्य परिस्थितीत राधानगरी विभागाचे पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग व संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने जलदगतीने केलेल्या कामाचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार व जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कौतुक केले आहे.

तसेच आपत्कालीन परिस्थितीत जिल्ह्यातील सर्व यंत्रणेने सतर्क राहून नागरिकांना आवश्यक ती मदत तात्काळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : विकसित भारताच्या वाटचालीत युवकांची मोठी भूमिका; पुढील पाच ते सात वर्षांत मोठ्या सुधारणा करण्याचा मोदींचा निर्धार

El Nino Alert : पुढील वर्षाच्या मॉन्सूनबाबत हवामान विभागाचे मोठे संकेत! प्रशांत महासागराचे तापमान होणार कमी; 'एल निनो' ओसरणार? 'नोआ'च्या अहवालाने वाढवली चिंता

HOROSCOPE: १५ ऑगस्टपासून ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरू; आर्थिक स्थिती सुधारणार अन् करिअरमध्ये मिळणार मोठं यश, तुमची रास कोणती?

Census 2026: जनगणनेसाठी ४० प्रश्‍नांची सूची; स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातिगणनाही होणार

ASIA CUP 2026: जेमिमा रॉड्रिग्स आशिया कप आणि आशियाई खेळांमधून बाहेर; BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ धडाकेबाज फलंदाजाला मिळाली संधी

SCROLL FOR NEXT