kolhapur innovation demand for steam powered machines in England USA Canada Australia marathi news 
कोल्हापूर

जगभरातील खव्याला कोल्हापुरी गोडवा; वाफेवर चालणाऱ्या मशिनना इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलियात मागणी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  येथील उद्यमशीलता आणि जे काही करायचं ते सर्वोत्कृष्टच, या ध्यासातून अनेक नवे शोध लागले आणि पुढे त्याला जगात मान्यता मिळाली. २५ वर्षांपूर्वी उद्योजक दिलीप यादव यांनी देशातील पहिले खवा तयार करण्याचे मशिन तयार केले. सुरवातीला ते विजेवर किंवा डिझेल-रॉकेलवर चालायचे; पण, पुढे वाफेवर चालणारी मशिन्स त्यांनी तयार केली आणि त्याला जगभरातून मागणी वाढली. भारताबरोबरच सध्या इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलियात या मशिनला मागणी असून, विशेषतः लॉकडाउननंतरही ती कायम आहे. 

राजेंद्रनगर परिसरात राहणाऱ्या यादव यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पुणे) येथून १९६५ मध्ये बीई (मेकॅनिकल) पदवी घेतली. १९९४ मध्ये सोलर आर्क्‍स ही फर्म त्यांनी गोकुळ शिरगावात स्थापन केली. त्यावेळी देशभरात कढईत दूध घोटून हाताने खवा तयार व्हायचा. हे काम अतिशय कष्टाचे व जास्त वेळ खाणारे होते. नृसिंहवाडीतही पेढे बनवण्यासाठी खव्याची मोठी मागणी असायची. तेथील काही लोकांनी यादव यांना याबाबत सांगताच त्यांनी लगेचच मशीनसाठी प्रयत्न सुरू केले आणि तीन वर्षांच्या अखंड परिश्रमानंतर देशातील पहिले खवा तयार करण्याचे मशीन तयार झाले. त्याची माहिती मिळताच देशभरातून ऑर्डर येऊ लागल्या.

कोलकत्त्याचे हल्दीराम, पुण्याचे चितळे- काका हलवाईंपासून सर्वच मोठ्या मिठाई व्यावसायिकांकडून या मशिनला मागणी वाढली. मात्र, तेवढ्यावरच न थांबता यादव यांनी मशीनमध्ये विविध प्रयोग केले. वीज, इंधन बचत झाल्यास संबंधित उत्पादनाचा खर्च कमी होईल, यासाठी त्यांनी आग्रह धरला आणि अखेर वाफेवर चालणारे मशीन तयार झाले.

पुढची पिढीही व्यवसायात...
यादव यांचा मुलगा अमोल यादव यांनी ‘केआयटी’मधून ‘बीई’ पदवी घेतली. त्यानंतर त्यांनीही या व्यवसायातच लक्ष घातले असून, मशीनच्या निमित्ताने कोल्हापूरचे नाव जगभरातील अधिकाधिक देशात पोचावे, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer: श्रेयस अय्यर आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंशी संवाद साधण्यास उत्सुक; जपानविरुद्ध ऐतिहासिक टी-२० सामन्याचीही उत्सुकता

ED Raid Karnataka: जारकीहोळींच्या घरी ‘सार्वजनिक’ची कागदपत्रे अन् लाखोंचे परदेशी चलन; ईडीच्या छाप्यात काय काय आढळलं?

बाप तो बाप रहेगा! बाईबद्दल विधान शिंदेंच्या आमदाराला भोवणार, मध्यरात्री गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : खंबाटकी घाटातील नवीन बोगद्यातून वाहतूक सुरू; एकेरी मार्गामुळे आज वाहनांची मोठी कोंडी

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT