kolhapur news  esakal
कोल्हापूर

Kolhapur : अभियांत्रिकीत रोजगाराच्या सर्वाधिक संधी

‘सकाळ’ व डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगतर्फे कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : अभियांत्रिकीचे विद्यार्थी हे ‘प्रॉब्लेम सॉल्व्हर्स’असून, अन्य कोणत्याही अभ्यासक्रमांपेक्षा अभियांत्रिकीत रोजगाराच्या सर्वाधिक संधी उपलब्ध आहेत, असे डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी आज येथे सांगितले.

सकाळ माध्यम समूह व डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त संस्था) आयोजित ‘अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया २०२२-२३’ विषयावरील मार्गदर्शनपर कार्यशाळेत ते बोलत होते. हॉटेल सयाजीमध्ये कार्यशाळा झाली.

डॉ. गुप्ता म्हणाले, की अभियंत्यांची संख्या वाढल्याने त्यांना पुरेशा नोकऱ्या नसल्याची चर्चा होत आहे. वस्तुस्थिती तशी नाही. सध्या सर्वाधिक करिअरची संधी अभियांत्रिकीमध्येच आहे. बहुतांश मुलांना कॉम्प्युटर सायन्समध्येच शिक्षण घ्यायचे आहे. कॉम्प्युटर म्हणजे हमखास नोकरी, असा समज निर्माण झाला आहे.

मात्र,अभियांत्रिकीच्या अन्य शाखाही तेवढ्याच महत्वाच्या आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सरकारी नोकरीच्या सर्वाधिक संधी आहेत. मेकॅनिकलचे महत्व कधीच कमी होणार नाही. वाहन उद्योगात या अभियंत्यांची मागणी सतत राहील. रसायन उद्योगासह अन्यत्र केमिकल इंजिनिअरला मोठ्या संधी आहेत. मोबाईल व अन्य गॅझेटचे मार्केट वेगाने वाढत असून, इलेक्ट्रॉनिक अँड टेली कम्युनिकेशसह कॉम्प्युटरच्या विविध शाखांमध्ये अगणित संधी आहेत.’’

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, राज्य सीईटी सेलचे प्रवेश प्रक्रिय तज्ज्ञ डॉ. कुणाल पाटील, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, प्रा. रवींद्र बेन्नी, डॉ. व्ही. व्ही. भोसले उपस्थित होते. प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुनंदा शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रवींद्र बेन्नी यांनी आभार मानले.

रोजगारात अभियांत्रिकी प्रथम क्रमांकावर...

नोकरीच्या संधींमध्ये पहिल्या स्थानावर बी.ई., बी.टेक, तर दुसऱ्या स्थानावर एमबीए आहे. अन्य कोणत्याही अभ्यासक्रमांपेक्षा अभियांत्रिकीत नोकरीच्या सर्वाधिक संधी आहेत. २०२१ मध्ये उत्तीर्ण झालेल्या नऊ लाख ४१ हजार ३९१ अभियंत्यांपैकी ८९ टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली असल्याचे डॉ. गुप्ता यांनी आकडेवारीसह स्पष्ट केले.

कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन फिजिकल मोडनेच

राज्य सीईटी सेलची प्रवेशप्रक्रिया यंदा ‘कॅप’च्या तीन फेऱ्यांद्वारे होणार असल्याची माहिती तज्ज्ञ कुणाल वाय. पाटील यांनी दिली. कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन केवळ फिजिकल मोडनेच होणार आहे. त्यामुळे अर्ज भरल्यावर त्याची प्रिंट व कागदपत्र झेरॉक्स नजीकच्या सुविधा केंद्रात तपासून घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT